अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण !
‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श ठेवून आम्ही राज्यकारभार करत आहोत. त्यामुळे आम्ही अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.’’
गोवा : पद्मश्री विनायक खेडेकर आणि पंडित प्रभाकर कारेकर गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित
गोमंत विभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात पद्मश्री विनायक खेडेकर यांना लोककलेसाठी आणि पंडित प्रभाकर कारेकर यांना भारतीय शास्त्रीय संगीतासाठी गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गोवा : पर्वरी येथे मंत्रालयाचे गीताश्लोक पठण करून उद्घाटन
घटक राज्यदिनाच्या मुहूर्तावर ३० मे या दिवशी पर्वरी येथील विधानसभा संकुलातील जुन्या मिनिस्टर ब्लॉकचे नूतनीकरण आणि त्याचे मंत्रालय असे नामकरण सोहळा वैशिष्ट्यपूर्ण झाला; मात्र या सोहळ्याला विरोधी पक्षाचा एकही आमदार अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हता.