कुरेशी आणि साथीदारांवर गुन्हा नोंद
बनावट नंबर पाट्या लावून करत होते गोमांसाची तस्करी

पुणे – चांदे गोडेगाव (जि. अहिल्यानगर) येथील सराइत गोतस्कर मंझिर कुरेशी, सुभान कुरेशी आणि त्यांचे साथीदार गोवंशियांची कत्तल करून त्याचे मांस हडपसर-कोंढवा परिसरात विक्रीसाठी पाठवत आहेत, अशी माहिती गोरक्षकांनी मिळाली होती. त्यानुसार मुंढवा-हडपसर बायपास रस्त्यावरील ‘लक्ष्मी बजाज ऑटो शोरूम’जवळ २२ जून या दिवशी गोरक्षक आणि पोलीस यांनी तात्काळ सापळा रचून संशयित चारचाकी अडवली. त्या वेळी ‘डिक्की’मध्ये (गाडीच्या मागे सामान ठेवण्याच्या जागेमध्ये) क्रूरपणे कापलेले गोवंशियांचे अंदाजे ४५० किलो मांस, कातडी आणि पाय आढळून आले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी गाडीवर बनावट नंबर पाटी लावली होती. पोलिसांनी चारचाकी चालक आरोपी अजय शेलार याला अटक केली. हे गोमांस कोंढवा येथील सादिक इसाक कुरेशी आणि आजिम पठाण यांच्याकडे पोचवले जाणार असल्याचे समजते. या प्रकरणी गोरक्षक ऋषीकेश कामटे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी कुरेशी आणि साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन