Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्‍या सुहेल याला कर्नाटकमधून अटक

भ्रमणभाषमध्ये सापडले पाकिस्तानी क्रमांक आणि शस्त्रास्त्रांसह असणारी छायाचित्रे

दावणगेरे (कर्नाटक) – अयोध्येतील श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि आतंकवादविरोधी पथक यांनी येथून २० वर्षांच्या सुहेल नावाच्या आतंकवाद्याला अटक केली. त्याने श्रीराममंदिराला लक्ष्य करण्याचा कट रचल्याची स्वीकृती दिली आहे. सुहेलच्या भ्रमणभाष संचामध्ये पाकिस्तानी क्रमांक, संशयास्पद व्हॉट्सप ग्रुप आणि शस्त्रास्त्रांसमवेत घेतलेली छायाचित्रेही सापडली आहेत.

सुहेलच्या अटकेनंतर पोलिसांच्या पथकांनी सहारनपूरमध्येही अनेक ठिकाणी धाडी घातल्या. सहारनपूर पोलिसांनी सुहेलच्या वडिलांचीही चौकशी केली आहे. कर्नाटकात राहून सुहेल ‘पेंटर’ (रंगकाम करणारा) म्हणून काम करत होता.

संपादकीय भूमिका

अशांना कारागृहात ठेवून पोसत रहाण्याऐवजी जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !