नाकात तूप आणि कानात तेल का घालावे ?
नस्य केल्याने मेंदूला शक्ती मिळते. डोकेदुखी, खांदेदुखी, केस गळणे किंवा पांढरे होणे, दोन नाकपुड्यांमधील पडदा (Nasal septum) एका कडेला सरकणे, दमा, जुनाट सर्दी, जुनाट खोकला यांसारख्या विकारांमध्ये, तसेच मानेच्या वरच्या भागाच्या आरोग्यासाठी प्रतिदिन नस्य करणे लाभदायक आहे.