अ‍ॅलोपॅथीच्या उपचारांनी बरी न होणारी कावीळ आयुर्वेदीय औषधांनी बरी होणे

‘नोव्हेंबर १९९८ मध्ये मला कावीळ झाली होती. रक्तातील ‘बिलिरुबिन’ जे ० ते १ एककांमध्ये असावे लागते, ते ६ एकक झाले होते. आधुनिक वैद्यांची औषधे चालू केली; पण ‘बिलिरुबिन’ वाढत वाढत ३१ एककांपर्यंत गेले. रक्तातील ‘एस्.जी.पी.टी.’ आणि ‘एस्.जी.ओ.टी.’ हे घटकही पुष्कळ वाढले होते. १९.१२.१९९८ पर्यंत असेच चालले होते. तेव्हा ‘एन्डोस्कोपी’ केली; पण त्यातही काही निष्पन्न झाले नाही. आधुनिक वैद्यांनी आईला सांगितले होते की, हिचे काही खरे नाही. त्यानंतर आम्ही वैद्य वसंत गुंडो कुलकर्णी यांच्याकडे गेलो. त्यांनी काढे आणि काही औषधे दिली. परिणामी कावीळ न्यून होऊ लागली आणि मी हळूहळू पूर्ण बरी झाले. काढा अत्यंत कडू असायचा. त्या वेळी थंडाव्यासाठी गुलकंद आणि कोकम सरबत घेतले. आयुर्वेदीय उपचारांनी मी बरी झाले. हा अनुभव मी स्वतः घेतल्यामुळे कावीळ हा रोग आयुर्वेदीय उपचारांनीच बरा होणारा आहे, हे निश्‍चित झाले. ईश्‍वरी प्रेरणा मिळाल्यानेच मी त्या वैद्यांकडे जाऊ शकले. ही अनुभूती लिहून देतांना आनंद होत आहे.’

– सौ. गार्गी भि. भिडे, नवीन पनवेल (१०.५.२०१४)