आगामी काळात महायुद्धासह नैसर्गिक आपत्तीही ओढवतील. तेव्हा डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध होणेही कठीण होईल. अशा वेळी विकार आणि आपत्ती यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा भाग म्हणून ही ग्रंथमालिका वाचा ! या मालिकेतील ग्रंथ नेहमीसाठीही उपयुक्त आहेत.
आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !
प्रतिदिन व्यायाम किंवा योगासने करणे, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पचायला हलका पण सकस आहार घेणे, पुरेशी झोप घेणे आदी दिनचर्येतील मूलभूत कृती केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर निरोगी राहते. या कृतींविषयी सोपे अन् सविस्तर मार्गदर्शन करणारा ग्रंथ !
रक्तस्राव, जखम, अस्थीभंग आदींवरील प्रथमोपचार
जखमेतून मोठा रक्तस्राव होणे, सांधा निखळणे, स्नायूंत गोळा येणे आदी प्रसंगी करावयाचे प्रथमोपचार या ग्रंथात दिले आहेत. यासमवेत ‘ड्रेसिंग’, ‘बँडेज’ आणि ‘झोळी (स्लिंग)’ यांविषयी केलेल्या सचित्र विवेचनातून या कृती कशा कराव्यात, हे समजणे सुलभ होईल.
संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनची ग्रंथसंपदा SanatanShop.com वरही उपलब्ध !