नाकात तूप आणि कानात तेल का घालावे ?

नाकात औषध घालणे (नस्य)

नाकात २-२ थेंब तेल वा तूप घालणे याला ‘नस्य’ असे म्हणतात.

लाभ : नस्य केल्याने मेंदूला शक्ती मिळते. डोकेदुखी, खांदेदुखी, केस गळणे किंवा पांढरे होणे, दोन नाकपुड्यांमधील पडदा (Nasal septum) एका कडेला सरकणे, दमा, जुनाट सर्दी, जुनाट खोकला यांसारख्या विकारांमध्ये, तसेच मानेच्या वरच्या भागाच्या आरोग्यासाठी प्रतिदिन नस्य करणे लाभदायक आहे.

कानात तेल घालणे (कर्णपूरण)

कानात तेल घालण्याला ‘कर्णपूरण’ म्हणतात. कर्णपूरणासाठी खोबरेल तेल, तीळतेल किंवा सरकीचे तेलही वापरू शकतो.

लाभ : कानात तेल घातल्याने कानाचे आरोग्य सुधारते. कान दुखणे, चक्कर येणे, उभे राहिल्यावर रक्तदाब न्यून होणे, चालतांना तोल जाणे यांसारख्या व्याधींमध्ये नियमित कर्णपूरण करण्याने लाभ होतो. जे लोक नेहमी कानाला ‘इअरफोन’ लावून असतात त्यांनी नेहमी कर्णपूरण करावे.

– वैद्य मेघराज पराडकर, आयुर्वेदाचार्य, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.