१. सातत्याने खोकला येणे, दम लागणे या विकारांमध्ये खोबरेल तेल दिवसातून २-३ वेळा १-२ चमचे प्यावे. यामुळे खोकल्याची ढास लगेच थांबते.
२. धुळीची अॅलर्जी असणार्यांनी दिवसातून ५-६ वेळा खोबरेल तेलाच्या बाटलीत १ करंगळी बुडवून तिला लागलेले तेल नाकपुड्यांना आतून लावावे. यामुळे नाकात येणारी धूळ तेलाला चिकटल्याने श्वसनमार्गात जात नाही आणि धुळीपासून होणारे त्रास न्यून होतात.
३. १ चमचा खोबरेल तेल टाळूवर जिरवावे. ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी ५-१० मिनिटे थापट्या माराव्या आणि चोळावे.
४. प्रतिदिन अंघोळीपूर्वी शरिराला खोबरेल तेल लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन सांध्यांना वंगण मिळते.
– वैद्य सुविनय दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग