कल्याण येथे शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक परिचारिकेकडून होणारा बायबलचा प्रचार हिंदुत्वनिष्ठांंनी थांबवला !

प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या वृत्तीचे धर्मांध ख्रिस्ती ! अशांवर कारवाई करणे अपेक्षित ! पूर्व भागातील नेतीवली येथे असलेल्या शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना ‘नवा करार’ची (बायबलची) प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात होता.

शासकीय रुग्णालयातील हिंदूंच्या धर्मांतराच्या कारवाया शासनाने रोखाव्यात !

कल्याणच्या नेतीवली येथील शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना बायबलची प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात असल्याचे आढळल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.