गुरुदेवांप्रती अपार भाव असणारी ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची नंदीहळ्ळी (जिल्हा बेळगाव) येथील कै. (कु.) श्रुती सिद्धाप्पा हलगेकर (वय १८ वर्षे) !

‘२३.७.२०२४ या दिवशी दुपारी कु. श्रुती सिद्धाप्पा हलगेकर (वय १८ वर्षे) हिचे निधन झाले. २१.८.२०२४ या दिवशी तिचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि साधक यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये अन् तिच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी ते आसनस्थ असलेल्या रथात साधिकेला विठ्ठलाचे दर्शन होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आसनस्थ झालेला रथ पटांगणात येत असतांना मला ‘तो रथ वैकुंठलोकातून हळूहळू खाली भूमीवर येत आहे’, असे वाटत होते. तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘रथात साक्षात् विठ्ठल उभा आहे. मी पंढरपूरला असून वारीतील रिंगण चालू आहे.’

पू. पृथ्वीराज हजारे यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘जानेवारी २०२४ मध्ये मी एकदा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. तेव्हा मला पू. पृथ्वीराज हजारेकाका हे समोरून येतांना दिसले. तेव्हा त्यांच्या ‘देहातून वीज चमकावी त्याप्रमाणे पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला दिसले. त्यानंतर काही क्षण मी त्यांच्याकडे बघतच राहिले…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त येणार्‍या साधकांची निवासव्यवस्था स्वतःच्या घरी भावपूर्ण करतांना आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘जेव्हा मला सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून समजले की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त अन्य जिल्ह्यातील साधक आमच्या ‘हॉटेल गुरुप्रसाद’ (विश्रामगृह) येथे येणार आहेत, तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली…

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

‘दुपारी १.३० ते अनुमाने ५ – ६ वाजेपर्यंत रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा असायची. माझे पाय दुखतात आणि मला अन्य शारीरिक अडचणी आहेत. मी पाहुण्यांना आश्रम दाखवत असतांना देहभान विसरायचे. त्यामुळे माझ्या शारीरिक दुखण्याकडे माझे लक्ष जात नसे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आळवल्यावर दोन्ही डोळ्यांतील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म सहजतेने होणे

९.६.२०२३ या दिवशी ‘प.पू. डॉक्टरच माझा हात धरून मला शस्त्रकर्मकक्षात घेऊन जात आहेत’, असे मला वाटले. शस्त्रकर्मकक्षात प.पू. डॉक्टरांसारखेच उंच आणि त्यांच्यासारखेच दिसणारे नेत्र शल्यकर्मतज्ञ पाहून मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघतच राहिलो. त्यांना पहातांना मी माझे देहभान विसरलो.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती !

स्वप्नात वशिष्ठऋषींनी साधिकेला दर्शन देणे आणि ‘या जन्मात मी प.पू. दादाजी यांच्या रूपात तुझ्या समवेत आहे’, असे त्यांनी सांगणे…

सद्गुरु स्वाती खाडये यांना भेट म्हणून मिळालेली श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती जागृत असल्याचे जाणवणे

जेव्हा मी देवीच्या समोर उभे न रहाता माझ्या थोडे डावीकडे सरकून देवीचे ४५ अंश कोनातून दर्शन घेतले, तेव्हा ‘देवीने तिचे डोळे उजवीकडे फिरवले आहेत’, असे मला जाणवले…

महावितरण आस्थापनात कार्यरत असतांना ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे (वय ४४ वर्षे) यांनी केलेले व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न !

श्री. नीलेश सहदेव नागरे महावितरण आस्थापन, निफाड (नाशिक) येथे उपकार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत. या लेखात श्री. नीलेश नागरे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असतांना आरंभीच्या काळात त्यांना आलेल्या अनुभूतींविषयी दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी पू. रमेश गडकरी (वय ६६ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !

२५.५.२०२४ या दिवशी सकाळी उठल्यावर मी खोलीतील गुरुदेवांच्या चरणांच्या छायाचित्राची पूजा केली आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या खोलीत गेलो.