दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात उपस्‍थित राहिलेल्‍या काकोडा (कुडचडे), गोवा येथील एका धर्मप्रेमींनी व्‍यक्‍त केलेले मनोगत !

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन गोवा येथील श्री रामनाथ देवस्‍थान येथील रामनाथ देवाच्‍या प्रांगणात चालू असतांना ‘एक तेजोमय अद़्‍भुत शक्‍ती सतत आपल्‍या समवेत कार्यरत असून ती संत, साधू, स्‍वामी, साधक अन् देशभक्‍त यांच्‍याकडून नियोजनबद्ध कार्य करवून घेत आहे’, असे मला निरंतर जाणवत होते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी तिन्‍ही गुरूंचा अवर्णनीय दर्शनसोहळा पहातांना पुष्‍कळ भावजागृती होऊन भावाश्रू येणे आणि तिन्‍ही गुरूंच्‍या डोळ्‍यांतूनही भावाश्रू येणे

राष्‍ट्रीय हिंदु अधिवेशनाच्‍या वेळी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात सेवेसाठी आल्‍यावर नागपूर येथील सौ. पुष्‍पा बारई (वय ५७ वर्षे) यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्‍यांना आलेल्‍या अनुभूती !

‘वर्ष २०२२ मध्‍ये झालेल्‍या राष्‍ट्रीय हिंदु अधिवेशनाच्‍या वेळी मी सेवेसाठी सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात गेले होते. त्‍या वेळी मला पुढील सूत्रे लक्षात आली.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयात नृत्‍यकलाकार नृत्‍याच्‍या माध्‍यमातून देवाला अनुभवण्‍याचा प्रयत्न करतात ! – डॉ. सहना भट, संस्‍थापिका, ‘नाट्यांजली कला केंद्र’, हुब्‍बळ्ळी, कर्नाटक

हुब्‍बळ्ळी, कर्नाटक येथील ‘नाट्यांजली कला केंद्रा’च्‍या संस्‍थापिका डॉ. सहना भट (भरतनाट्यम् नृत्‍यांगना) यांनी वर्ष २०२२ मध्‍ये महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाला भेट दिली होती. त्‍यांच्‍या लक्षात आलेली सूत्रे त्‍यांच्‍याच शब्‍दांत पहाणार आहोत.

भावजागृती प्रयोगाच्‍या माध्‍यमातून साधकांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात जाऊन श्रीकृष्‍ण आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा अनुभवणे

‘श्री विष्‍णवे नमः ।’ असा नामजप करत वैकुंठाच्‍या द्वाराशी येणे आणि आत प्रवेश केल्‍यावर प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या छायाचित्राचे दर्शन घेतल्‍यावर त्‍यांनी आशीर्वाद देणे

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथे सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या धर्मध्‍वजारोहणाच्‍या वेळी साधकांना आलेल्‍या अनुभूती

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ धर्मध्‍वजाची दोरी हळूहळू ओढत होत्‍या. तेव्‍हा शंखनाद चालू झाला. त्‍या वेळी मला २ मिनिटे ध्‍यान लागल्‍यासारखे वाटले. मला पायाखालची भूमी हलल्‍यासारखी वाटली.

ग्‍वाल्‍हेर (मध्‍यप्रदेश) येथील सौ. वैदेही पेठकर यांना ‘दशम अखिल भारतीय हिंदु-राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या कालावधीत आलेल्‍या अनुभूती

‘जून २०२२ मध्‍ये ‘दशम अखिल भारतीय हिंदु-राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या वेळी सभागृहात उपस्‍थित संत देवतांचा जयघोष करत होते आणि हिंदु राष्‍ट्राविषयीच्‍या उद़्‍घोषणा देत होते. त्‍या वेळी ‘संपूर्ण भारतात चैतन्‍य पसरत आहे’, असे मला जाणवले.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’त श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मार्गदर्शन करतांना गुरुदेवांची जाणवलेली महानता !

‘गुरुदेवांचे कार्य किती अगाध आहे ! आणि  हे जाणण्‍यास माझी बुद्धी किती थिटी पडली आहे’, याची मला जाणीव झाली. ‘आता गुरुदेवच माझ्‍या उद्धारासाठी माझ्‍यावरील आवरण नष्‍ट करून त्‍यांच्‍या खर्‍या रूपाची ओळख मला करून देत आहेत’, असे मला जाणवले.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’तील अडथळे दूर होण्‍यासाठी नामजपादी उपाय करतांना देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील संतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘११.५.२०२३ या दिवशी होणार्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या कार्यक्रमातील अडथळे दूर व्‍हावेत’, यासाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील संतांनी नामजपादी उपाय केले. त्‍या वेळी त्‍यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

युवा कार्यशाळेच्‍या वेळी पू. अशोक पात्रीकरकाका (वय ७३ वर्षे) यांचे मार्गदर्शन ऐकतांना साधिकेला आनंद जाणवणे

पू. पात्रीकरकाकांचे सत्र चालू होऊन ते बोलू लागल्‍यावर माझी दृष्‍टी त्‍यांच्‍यावर ५ – १० मिनिटांपर्यंत स्‍थिर झाली. माझी दृष्‍टी त्‍यांच्‍यावरून दूर जातच नव्‍हती. त्‍या वेळी माझ्‍या शरिरावर २ मिनिटांसाठी रोमांचही उभे राहिले आणि माझी भावजागृती झाली.