दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात उपस्‍थित राहिलेल्‍या काकोडा (कुडचडे), गोवा येथील एका धर्मप्रेमींनी व्‍यक्‍त केलेले मनोगत !

१. ‘एक दैवी शक्‍ती हे कार्य करवून घेत आहे’, असे जाणवणे

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन गोवा येथील श्री रामनाथ देवस्‍थान येथील रामनाथ देवाच्‍या प्रांगणात चालू असतांना ‘एक तेजोमय अद़्‍भुत शक्‍ती सतत आपल्‍या समवेत कार्यरत असून ती संत, साधू, स्‍वामी, साधक अन् देशभक्‍त यांच्‍याकडून नियोजनबद्ध कार्य करवून घेत आहे’, असे मला निरंतर जाणवत होते.

२. सनातनच्‍या संतांचे जाणवलेले सामर्थ्‍य !

हे अधिवेशन जून मासात होत असतांना आणि जून मास पावसाचा असूनही सनातनचे संत अन् साधक यांच्‍या साधनेमुळे या अधिवेशनात कसलाही त्रास झाला नाही. धर्मांधांची सावलीही अधिवेशनावर पडली नाही. ७ दिवस चालू असलेले एवढे मोठे अधिवेशन निर्विघ्‍नपणे पार पडले. हे पुष्‍कळ कौतुकास्‍पद असून यातून सनातनचे संत आणि साधक यांचे सामर्थ्‍य माझ्‍या लक्षात आले.’

– श्री. संजय दिनकर शिरसाट, काकोडा, कुडचडे, गोवा. (१८.६.२०२२)