साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
सध्या अनेक जण संतांच्या अनुभवसिद्ध ज्ञानापेक्षा वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्वास ठेवतात. त्यामुळे वर्ष २०१४ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने …
जे साधक, हितचिंतक, वाचक आदींना मूर्तीकलेविषयी ज्ञान आहे किंवा ज्यांची हे सर्व साधना म्हणून शिकण्याची अन् सेवा करण्याची इच्छा आहे, अशांनी त्यांची नावे जिल्हासेवकांच्या माध्यमातून कळवावी.
सनातनचे ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने वाण म्हणून देण्यास सर्वाेत्तम आहेत. त्यामुळे साधकांनी वाचक, जिज्ञासू, महिला मंडळे, तसेच बचत गट आदींना लवकरात लवकर संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे आणि सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने वाण म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.
सात्त्विक कलाकृतीच्या निर्मितीसाठी अधिकाधिक लोकांना मूर्तीचा लाभ करून घेता यावा, या उद्देशांनी मूर्तीची संगणकीय त्रिमितीय रचना करण्याचे नियोजिले आहे.
‘व्हिडिओ एडिटिंग’च्या क्षेत्रातील जाणकारांना सेवेची संधी ! ज्या साधकांना ही सेवा शिकून घेऊन घरी काही वेळ ती करू शकतात, अशांनीही जिल्हासेवकांच्या माध्यमातून संपर्क करावा.
सनातन संस्था गेली २५ वर्षे अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. या कालावधीत साधक, वाचक, हितचिंतक यांचा परस्पर परिचय होऊन ते अध्यात्म अन् साधना यांसह वैयक्तिक स्तरावर काही व्यवहार करत असल्यासे निदर्शनास आले आहे…
१४.१.२०२५ या दिवशी मकरसंक्रांत, तर ४.२.२०२५ या दिवशी रथसप्तमी आहे. या कालावधीत सुवासिनी स्त्रिया अन्य स्त्रियांना भांडी, प्लास्टिकच्या वस्तू किंवा नित्योपयोगी साहित्य वाण म्हणून देतात…
साधक, धर्मप्रेमी, वाचक, हितचिंतक यांना अनोळखी ‘लिंक’ प्राप्त झाल्यास ती न उघडता तो संदेश ‘डिलीट’ करावा. जेणेकरून पुढे कुठल्याही प्रकारचा अनर्थ होणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये गोंधळून न जाता, न घाबरता अशा प्रकारची ‘लिंक’ डिलीट करून तिच्याकडे दुर्लक्ष करावे.
‘जन्म, मृत्यू आणि विवाह’ या तिन्ही गोष्टी प्रारब्धाच्या अधीन असून त्या प्रारब्धानुसारच घडत असतात. असे असले, तरी साधकांनी आपले क्रियमाण कर्म वापरून ‘साधना अखंड चालू रहावी’, या उद्देशाने साधना करणारा किंवा साधनेसाठी पूरक असलेला जोडीदार निवडण्यावर भर द्यावा आणि मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्यावे !