कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती होण्यासाठी सेवारत होण्याची सुसंधी साधा !

‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’ ही संकल्पना सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मांडली आहे. ग्रंथांची मुखचित्रे, पंचांग, फलक, हस्तपत्रके, ‘सीडी कव्हर’, सूक्ष्म-चित्रे, बोधचित्रे, विज्ञापने आदी सेवा उपलब्ध आहेत. या सेवांमध्ये आपणही सहभागी होऊ इच्छित असल्यास स्वत:ची माहिती जिल्हासेवकांच्या माध्यमातून कळवा !

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

सर्वत्रच्या साधकांनी जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांना भेटून ग्रंथांविषयीची माहिती सांगावी. विद्यार्थ्यांना ‘संस्कार’, राष्ट्र यांविषयीचे आणि अन्य ग्रंथ पारितोषिक म्हणून देण्यास प्रवृत्त करावे. 

दिनदर्शिकेद्वारे परिचितांना आपल्या व्यवसायाची माहिती देतांना धर्मकार्यही घडावे, यासाठी स्वतःची विज्ञापने असलेले ‘सनातन पंचांग’ छापून घ्या !

सनातनचे निःस्वार्थी कार्य पाहून आतापर्यंत पुणे येथील ‘बाफना ज्वेलर्स’, गुजरातमधील ‘इलेक्ट्रोथर्म’, देहली येथील ‘मेट्रो बिल्डटेक’, चेन्नई येथील ‘कुमारन् सिल्क’ या आस्थापनांनी केवळ स्वतःची विज्ञापने असलेले ‘सनातन पंचांग’ छापून घेतले आहे.‘सनातन पंचांगा’ची वैशिष्ट्ये !

पुढील वर्षी निवृत्तीवेतन प्राप्त होण्यासाठी नोव्हेंबर २०२४ मध्ये अधिकोषाला ‘जीवन प्रमाणपत्र’ (‘लाईफ सर्टिफिकेट’) द्यावे !

‘शासकीय अथवा अशासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला ‘निवृत्तीवेतन’ (पेन्शन) देण्यात येते. त्यासाठी त्यांना ज्या अधिकोषातून आपण निवृत्तीवेतन घेतो, त्या अधिकोषात प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात ‘जीवन प्रमाणपत्र’ द्यावे लागते. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्तीवेतन चालू राहू शकते. प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेविषयीची माहिती पुढे दिली आहे. 

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

उपलब्ध संदर्भांनुसार श्रीरामाने ११ सहस्र ५३ वर्षे आणि श्रीकृष्णाने १२५ वर्षे कार्य केले. यांनुसार अन्य अवतारांच्या कार्यकाळाबाबत कुणाकडे माहिती उपलब्ध असल्यास त्यांनी ती कृपया सनातनला पुढील पत्त्यावर पाठवावी. माहिती पाठवतांना त्याचा यथायोग्य संदर्भही द्यावा….

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत दिवाळी विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २६ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !