साधकांनो, आपत्कालीन साहाय्यासाठी आवश्यक असलेले संपर्क क्रमांक (हेल्पलाईन नंबर) स्वत:च्या भ्रमणभाषमध्ये संरक्षित करून ठेवा !

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासकीय यंत्रणांचे साहाय्य मिळण्यासाठी संबंधितांचे संपर्क क्रमांक माहिती असणे आवश्यक !

सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची अद्ययावत् सूची प्रसारासाठी उपलब्ध !

सनातन-निर्मित सर्व सात्त्विक उत्पादनांची नावे आणि मूल्य असलेली सूची अद्ययावत करण्यात आली आहे. ही सूची नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे.

घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले संकलित अनुमाने दोन सहस्रांहून अधिक ग्रंथ लवकर प्रकाशित होण्यासाठी साधकांची आवश्यकता !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर संकलन करत असलेल्या ग्रंथांपैकी ऑक्टोबर २०२२ पर्यंत ३५९ ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती झाली आहे. अन्य अनुमाने २ सहस्रांहून अधिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे.

साधकांचे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे गांभीर्य वाढण्यासाठी उत्तरदायी साधकांनी सर्व साधकांच्या व्यष्टी लिखाणाचा आढावा घ्यावा !

उत्तरदायी साधकांनी सर्व साधकांची स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाची सारणी पहावी अन् त्याचा आढावा घ्यावा.

साधकांना सेवेसाठी साहाय्यक असलेल्या भ्रमणभाष, संगणक,‘इअरफोन’ इत्यादी उपकरणांवर वाईट शक्तींनी आक्रमण केल्यामुळे साधकांच्या सेवेत अडथळे निर्माण होणे

सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य व्यापक स्तरावर शीघ्र गतीने चालू आहे. साधकांची सेवा गतीने होण्यासाठी भ्रमणभाषचा वापर करणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे अनिष्ट शक्ती उपकरणांवर आक्रमणे करून धर्मप्रसाराचे कार्य आणि सेवा यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे आणत आहेत.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असलेल्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील पुढील सेवांमध्ये सहभागी व्हा !

हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या धर्मप्रेमींचा आधारस्तंभ असणार्‍या ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील वरील सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात खारीचा वाटा उचला !

पुढील वर्षी निवृत्तीवेतन प्राप्त होण्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये अधिकोषाला ‘जीवन प्रमाणपत्र’ (‘लाईफ सर्टिफिकेट’) द्यावे !

सर्वत्रच्या निवृत्तीवेतन धारकांनी ज्या अधिकोषातून आपण निवृत्तीवेतन घेतो, त्या अधिकोषात प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात ‘जीवन प्रमाणपत्र’ द्यावे लागते. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्तीवेतन चालू राहू शकते. या प्रक्रियेविषयीची माहिती देत आहोत.

हिंदूंनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष साजरे करू नये, याविषयी प्रबोधन करणारे हस्तपत्रक, भित्तीपत्रक आणि अन्य प्रसारसाहित्य उपलब्ध !

या प्रसारसाहित्यासाठी आवश्यकतेनुसार प्रायोजक मिळवून त्यांचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा, असे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.