साधकांचे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे गांभीर्य वाढण्यासाठी उत्तरदायी साधकांनी सर्व साधकांच्या व्यष्टी लिखाणाचा आढावा घ्यावा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘सध्या आपत्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्व साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसायला हवी. साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेचे गांभीर्य वाटले, तरच त्यांच्याकडून साधनेचे नियमित प्रयत्न होतील. यापुढे उत्तरदायी साधकांनी सर्व साधकांची स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाची सारणी पहावी अन् त्याचा आढावा घ्यावा. प्रत्यक्ष आढावा घेणे शक्य नसल्यास तो भ्रमणभाषवरून वा ई-मेलद्वारेही घेता येईल. साधकांच्या व्यष्टी प्रयत्नांत खंड पडू नये, यासाठी अशी आढावापद्धत सर्वत्र घालणे आवश्यक आहे.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१०.२०२२)