वारीकाळात महिला वारकऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षा यांविषयी नवीन निर्देश लागू !

या निर्देशांनुसार वारी काळात दर १० ते २० कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय अन् न्हाणीघर यांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे निर्देश का द्यावे लागतात ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?

राज्यातील सर्व शासकीय विभागांतील २ लाख ४४ सहस्र ४०५ पदे रिक्त !

राज्यातील एकूण २९ शासकीय विभाग आणि त्यांच्या अंतर्गत येणारी विविध कार्यालये यांतील २ लाख ४४ सहस्र ४०५ पदे रिक्त आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकाराखाली ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सरकारच्या खात्यातील ही रिक्त पदांची माहिती उपलब्ध झाली आहे.

आदिवासींचे धर्मांतर केले जात असल्यावरून प्रशासनाकडून ओडिशातील चर्च बंद  

देशातील प्रत्येक चर्चमध्ये असे काही घडते का ? याचा शोध घेऊन दोषी चर्चवर अशाच प्रकारची कारवाई करावी, अशी हिंदूंनी मागणी केली, तर त्याच चुकीचे ते काय ?

आसाममध्ये पोलिसांच्या कह्यात असलेल्या मुसलमानाचा मृत्यू झाल्याने जमावाने पोलीस ठाणे जाळले !

जाळपोळ करणाऱ्यांपैकी ५ जणांची अवैध घरे प्रशासनाने पाडली

श्री क्षेत्र जेजुरीगड आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विकासकामांना संमती !

श्री क्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामास संमती देण्यात आली, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करतांना त्या वास्तूची मूळ शैली जपणे आवश्यक असून पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थेकडून ही कामे करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

नागरिकांनी प्लास्टिक कचरा गटारात टाकू नये !

महापालिकेच्या वतीने पावसाळापूर्व नालेसफाईची मोहीम चालू आहे. प्रत्येक चेंबरमधून प्लास्टिक कचरा निघत असल्यामुळे नागरिकांनी तो गटारामध्ये न टाकता महापालिकेच्या घंटागाडीमध्ये टाकावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारून हिंदु तरुणाशी विवाह केल्याने तिच्या जिवाला धोका

हिंदु तरुणीने मुसलमान तरुणाशी विवाह केला, तर ते ‘प्रेम’ आणि मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केला, तर तो ‘धर्मद्रोह’ हे लक्षात घ्या !

जालौन (उत्तरप्रदेश) येथे शौचालयांना अज्ञातांनी दिली मोगल आक्रमकांची नावे !

जालौन येथील ७ सार्वनजिक शौचालयांना अज्ञातांनी महंमद खिलजी, गझनी, हुमायू, अकबर, औरंगजेब आदी मोगल आक्रमकांची नावे देण्यात आल्याचे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले.

राज्यातील ६७४ अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश !

राज्यातील ६७४ शाळा अनधिकृत असल्याने त्या चालू राहिल्याने तेथील कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

धर्मांतराला प्रोत्साहन देणाऱ्या ‘कॉन्व्हेंट शाळां’वर कारवाई करा ! – किशोर घाटगे, शिवसेना

देशभरातील अनेक ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये जाणीवपूर्वक हिंदु विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांना शिक्षा देण्याचे प्रकार होतात. त्यांना बायबल शिकण्याची सक्ती केली जाते. या शाळा केंद्र सरकारच्या अंतर्गत येत असल्याने त्या राज्यशासनास जुमानत नाहीत.