श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला मनुष्यबळ पुरवठा करणार्या ‘रक्षक सिक्युरिटी’चा ठेका रहित !
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम दर्शवणारे हे उत्तम उदाहरण आहे. मंदिरात ठेका देऊन कर्मचारी न नेमता सेवाभावी भाविक-भक्तांची नेमणूक करणे अपेक्षित आहे.
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम दर्शवणारे हे उत्तम उदाहरण आहे. मंदिरात ठेका देऊन कर्मचारी न नेमता सेवाभावी भाविक-भक्तांची नेमणूक करणे अपेक्षित आहे.
गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील पर्यटक आणि भाजप सरकार यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे. गोवा सरकारची ८ जानेवारी या दिवशी मंत्रीमंडळ बैठक झाली. यामध्ये पर्यटनक्षेत्राविषयी चर्चा झाली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील २३ पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या गुन्ह्यात यंदा ५६८ ने घट झाली आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, भोसरी – एम्.आय्.डी.सी, सांगवी, हिंजवडी, वाकड, दिघी, आळंदी, देहूरोड आदी २३ ठाण्यांचा समावेश आहे.
तिसरे अपत्य जन्माला घातल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे साहाय्य आयुक्त श्रीनिवास दांगट या साहाय्यक आयुक्तांना बडतर्फ करण्यात आले आहे.
म्हादई जलवाटप तंट्यासंबंधी सरकारने नियुक्त केलेल्या सभागृह समितीने कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी काम चालू केलेल्या कळसा, भंडुरा, हलतरा आदी ठिकाणांची पहाणी करण्याचे ठरवले आहे.
राज्यात तिसरा जिल्हा बनवण्याचा प्रस्ताव सिद्ध झालेला आहे आणि त्याच्या कार्यवाहीची प्रक्रियाही चालू आहे. ८ जानेवारी या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला येऊ शकला नसला, तरी कालांतराने तो येणार आहे..
. . . हिंदूंनी पाश्चात्त्य संस्कृतीचा अंगीकार केल्यामुळे २ पिढ्यांतील, म्हणजेच आई-वडील अन् मुलगा-सूनही एकमेकांशी समरस होऊ शकत नाहीत. आता नवरा-बायकोचेही एकमेकांशी पटत नाही. लग्नानंतर अल्प कालावधीतच त्यांचा घटस्फोट होतो !’
मठ आणि मंदिरे यांना ‘लुटारू’ संबोधून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गोव्यातील लेखक दत्ता नायक यांच्या विरोधात काणकोण, मडगाव, तसेच अन्य पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी प्रविष्ट (दाखल) झाल्या आहेत.
बांगलादेशात सुदेव हलदर या २८ वर्षीय हिंदु तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आढळून आला.
कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे यांनी हिंदुहितार्थ केलेले कार्य समस्त हिंदुत्वनिष्ठांसाठी प्रेरणादायी !