साधिका कोरोनाबाधीत असतांना तिने गुरुदेवांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) मानस बोलणे, त्या वेळी तिला गुरुदेवांचे शिवरूप दिसून ‘ते साधकांचे रक्षण करणार आहेत’, असे सांगत असल्याचे जाणवणे

‘कोरोना महामारीमुळे वर्ष २०२१ मध्ये झालेल्या दुसर्‍या दळणवळण बंदीच्या काळात मला कोरोना झाला होता. तेव्हा मला दिलेल्या कोरोना प्रतिबंधक गोळ्यांमुळे मला झोप लागत नव्हती. त्या वेळी मला पुष्कळ भीती वाटायची; म्हणून मी गुरुदेवांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) मानस बोलायचे. तेव्हा गुरुदेवांनी मला त्यांचे रूप दाखवले. मला त्यांच्यामध्ये महादेवाचा अवतार दिसला. त्या वेळी त्यांनी म्हटले, ‘जेव्हा जेव्हा माझ्या साधकांवर संकट येईल, तेव्हा त्यांच्यावर आलेले संकट मी तिसरे नेत्र उघडून नाहीसे करणार आहे.’ तेव्हापासून आपत्काळाची आठवण झाली, तरी मला शिवरूपातील गुरुदेवांचे रूप आठवते.’

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सौ. मनीषा पिंपळे

घेतला भूवैकुंठात जयंतरूपाने अवतार ।
श्रीकृष्ण, राम, विष्णु रूपांमध्ये (टीप १) भूवैकुंठात (टीप २) जयंतरूपाचा अवतार (टीप ३) ।
जयंतरूपाने रामनाथीची केली गोकुळनगरी ।।
घेतला जयंतरूपाने रामाचा अवतार ।
रामनाथीची केली त्यांनी अयोध्यानगरी ।। १ ।।

जशी पंढरी सर्वांचे माहेर ।
तसे रामनाथी होणार पंढरपूर ।।

जसा पंढरीत नांदतो विठ्ठल ।
तसा भूवैकुंठात नांदे जयंतअवतार ।। २ ।।

टीप १ : महर्षींनी जीवनाडीपट्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या वाढदिवशी राम, कृष्ण आणि विष्णु यांचे रूप धारण केले होते.

टीप २ : भूवैकुंठात – रामनाथी आश्रमात

टीप ३ : जयंतरूपाचा अवतार – परात्पर गुरु डॉ. आठवले

– सौ. मनीषा हरिश पिंपळे, परभणी (१४.५.२०२२)