सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्य भाव असणार्‍या फोंडा, गोवा येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीरा करी (वय ६५ वर्षे) !

कार्तिक कृष्ण चतुर्थी (१२.११.२०२२) या दिवशी श्रीमती मीरा करी यांचा ६५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रामनाथी आश्रमातील साधिका कु. गायत्री जोशी हिला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांच्याप्रती भाव असलेले ईश्वरपूर (सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (पू. आबा (वय ८९ वर्षे)) !

परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. आबा यांचे जन्मोजन्मीचे नाते असल्याप्रमाणे पू. आबांचे विचार आधीपासूनच साधनेला पूरक होते; पण आमच्या ते लक्षात येत नव्हते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे पू. आबांना संतपद प्राप्त झाले आणि आम्हाला त्याची जाणीव झाली.

निसर्गाेपचार तज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिकवलेल्या बिंदूदाबन उपचारपद्धतीमुळे श्री. दिलीप नलावडे यांना झालेले लाभ !

‘निसर्गाेपचार तज्ञ डॉ. दीपक जोशी साधकांना बिंदूदाबन उपचारपद्धत शिकवण्यासाठी आणि साधकांवर उपचार करण्यासाठी अधून-मधून सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे येतात. त्यांनी केलेल्या उपचारांमुळे मला होत असलेले त्रास बरे झाले. त्याविषयी मला आलेले अनुभव येथे दिले आहेत.

केवळ ४ वर्षे सेवा आणि साधना करून संतपदी आरूढ झालेल्या पू. वसंत आठवले (अप्पाकाका) यांना अल्प कालावधीत स्वतःची प्रगती होण्याची जाणवलेली कारणमीमांसा

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांनी केवळ ४ वर्षे साधना करून ते संतपदी आरूढ झाले. त्यांनी  आध्यात्मिक प्रगती कशी केली ? याविषयीची कारणमीमांसा त्यांच्याच शब्दांत येथे पाहूया.

प.पू. बाळाजी आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे वडील) यांच्या छायाचित्राकडे पाहून मन शांत होणे अन् ते स्मितहास्य करत असल्याचे जाणवून ‘निर्विचार’ हा नामजप चालू होणे

‘प.पू. बाळाजी (प.पू. दादा, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे वडील) आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून माझे मन शांत झाले. ‘प.पू. दादा माझ्या समोर असून ते स्मितहास्य करत आहेत’, असे मला जाणवले आणि माझे मन निर्विचार झाले.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला खडकेवाडा (तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर) येथील कु. गुरुदास दत्तात्रय लोहार (वय १४ वर्षे) !

५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला खडकेवाडा (तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर) येथील कु. गुरुदास दत्तात्रय लोहार (वय १४ वर्षे) याच्याबद्दल त्यांच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या कु. अपाला औंधकर हिने केलेला भावप्रयोग

३.३.२०२१ या दिवशी दैवी बालकांच्या सत्संगात कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक स्तर ६१ टक्के, वय १५ वर्षे) हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या स्वच्छतेच्या संदर्भात पुढील भावप्रयोग करवून घेतला. त्या वेळी तिला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.