प.पू. बाळाजी आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे वडील) यांच्या छायाचित्राकडे पाहून मन शांत होणे अन् ते स्मितहास्य करत असल्याचे जाणवून ‘निर्विचार’ हा नामजप चालू होणे

प.पू. बाळाजी आठवले (प.पू. दादा)

‘२६.९.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘प.पू. बाळाजी (प.पू. दादा, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे वडील) आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून काय जाणवते ?’, या संदर्भात प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध झाला होता. त्या छायाचित्राकडे पाहून माझे मन शांत झाले. ‘प.पू. दादा माझ्या समोर असून ते स्मितहास्य करत आहेत’, असे मला जाणवले आणि माझे मन निर्विचार झाले. त्यानंतर माझा ‘निर्विचार’ हा नामजप आपोआप एकाग्रतेने चालू झाला. ‘परात्पर गुरुदेवांनी मला ही अनुभूती दिली’, यासाठी त्यांच्याप्रती कोटीशः कृतज्ञता!’

– श्री. दिनेश सीताराम कडव, दापोली, रत्नागिरी. (११.९.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक