(कै.) पू. पद्माकर होनपकाका यांच्या देहत्यागानंतर श्री. रामानंद परब यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

पू. पद्माकर होनप
श्री. रामानंद परब

१. पू. होनपकाका यांच्या खोलीत गेल्यावर ‘आपण एका पोकळीत आहोत’, असे जाणवणे

‘पू. होनपकाका यांच्या खोलीत गेल्यावर मला पुष्कळच शांत वाटत होते. ‘आपण एका पोकळीत आहोत’, असे मला जाणवले. ‘वातावरणात पुष्कळ मोठ्या प्रमाणात आनंदाचे प्रक्षेपण होत आहे’, असेही मला जाणवले.

२. पू. होनपकाका यांच्या शरिराच्या विविध भागांवरून काही अंतरावरून हात फिरवतांना जाणवलेली सूत्रे

२ अ. पायांतून मोठ्या प्रमाणात चैतन्य आणि शक्ती बाहेर पडत असल्याचे जाणवणे : पू. होनपकाका यांच्या पायांपासून ते डोक्यापर्यंत शरिरावरून काही अंतरावरून हात फिरवतांना ‘त्यांच्या पायांतून मोठ्या प्रमाणात चैतन्य आणि शक्ती बाहेर पडत आहे’, असे मला जाणवले.

२ आ. पू. काकांच्या पायांपासून ते डोक्यापर्यंत काही अंतरावरून हात फिरवत असतांना ‘छातीपासून वर अनाहतचक्रापर्यंत मोठ्या प्रमाणात गार संवेदना बाहेर पडत आहे’, असे मला जाणवले.

२ इ. पू. होनपकाका यांच्या सहस्रारारावर काही अंतरावरून हात ठेवल्यावर तेथून निर्माण होणार्‍या संवेदना हाताला पुष्कळ थंड जाणवल्या आणि ‘तेथे निर्माण होणारे चैतन्य माझ्या हाताला मागे ढकलत आहे’, असेही मला जाणवले.

२ ई. पू. काकांच्या संपूर्ण शरिरातून ‘आनंदाचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवले.

२ उ. ‘पू. काका ध्यानावस्थेत आहेत’, असेही मला जाणवले.

३. पू. होनपकाका यांच्या पार्थिवाकडे पाहून जाणवलेली सूत्रे

अ. पू. होनपकाका यांच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर ‘त्यांच्या पापण्यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले.

आ. ‘त्यांचा श्वास चालू आहे’, असेही मला जाणवले.

इ. ‘त्यांच्या चरणांतून मोठ्या प्रमाणात चैतन्य आणि शक्ती यांचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवले.

ई. त्यांच्या चरणांपासून ते कमरेपर्यंतच्या भागात मला उष्ण संवेदना जाणवल्या.

४. पू. होनपकाका यांचे हात आणि चरण यांच्या ठशांकडे पाहून जाणवलेली सूत्रे

४ अ. ‘पू. होनपकाकांच्या हातातून आनंदाचे आणि चरणांतून शक्तीचे प्रक्षेपण होत आहे’, असे जाणवणे : पू. होनपकाका यांच्या देहत्यागानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचा उजवा हात आणि उजवे चरण यांच्या ठशांचा प्रयोग करायचा निरोप पाठवला. प्रयोग करत असतांना दोन्ही ठशांकडे थोडा वेळ पाहिल्यावर ‘हातातून आनंदाचे आणि चरणातून शक्तीचे मोठ्या प्रमाणात प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवले.

४ आ. पू. होनपकाका यांच्या हाताच्या ठशाकडे पाहिल्यावर ‘ते आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवणे : ‘पू. होनपकाका यांच्या हाताच्या ठशाकडे पाहिल्यावर ‘ते आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले. ‘पू. काकांच्या हाताकडे पहातच रहावे’, असे मला सतत वाटत होते. त्या वेळी माझी भावजागृती होत होती.

५. पू. होनपकाका यांचा हात आणि चरण यांचे ठसे घेतांना जाणवलेली सूत्रे

५ अ. खोलीतील आनंदमय वातावरणामुळे ठसे घेण्याची सेवा पुष्कळ जलद गतीने होणे : एकंदरीतच पू. होनपकाका यांच्या खोलीतील वातावरण एवढे आनंदमय आणि चैतन्यमय होते की, आम्ही करत असलेली ठसे घेण्याची सेवा पुष्कळ जलद गतीने झाली.

५ आ. पू. होनपकाका स्वतःहून ठसे देत असल्याचे जाणवून त्यांची त्वचा, हात आणि चरण यांमध्ये जिवंतपणा जाणवणे : त्यांचे हात आणि चरण यांचे कागदावर ठसे घेतांना ‘ते स्वतःहून ठसे देत आहेत’, असे मला जाणवले.  त्यांची त्वचा, हात आणि चरण यांमध्ये मला जिवंतपणा जाणवला.

५ इ. ठसे घेण्याची सेवा करतांना वेदना न्यून होऊन चैतन्य मिळणे : पू. होनपकाका यांचे हात आणि चरण यांचे ठसे घेण्याची सेवा करतांना माझ्या शरिरात होत असलेल्या तीव्र वेदना न्यून झाल्या. ‘मला पुष्कळ मोठ्या प्रमाणात चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले.

६. पू. होनपकाकांचे हात आणि चरण यांचे ठसे घेण्याची सेवा करतांना ‘त्यांचा देहत्याग झाला आहे’, असे मला एकदाही जाणवले नाही.’

– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक