रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आल्यावर पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ (वय १५ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

२.५.२०२२ (वैशाख शुक्ल द्वितीया) या दिवशी पुणे येथील कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिचा १५ वा वाढदिवस आहे. एकदा ती रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आली होती. तेव्हा तिला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कु. आर्या श्रीश्रीमाळ

कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिला १५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. आश्रम पहातांना आलेल्या अनुभूती

अ. ‘श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे दर्शन घेतांना मला आनंद झाला आणि माझा श्री गणेशाचा नामजप चालू झाला.

आ. श्री भवानीदेवीची मूर्ती बघतांना मला पुष्कळ सात्त्विकता जाणवली. मला देवीचा तोंडवळा चैतन्यमय जाणवला आणि भवानीदेवीचे स्थुलातील अस्तित्व अनुभवता आले.

इ. ध्यानमंदिरात नामजप करतांना माझे मन एकाग्र झाले होते. त्या वेळी माझ्या मनात इतर विचार आले नाहीत.

श्री. महावीर श्रीश्रीमाळ

२. सर्व साधकांची सेवेची तळमळ पाहून ‘आपणही सेवा करावी’, असे मला वाटले.’

३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटल्यावर आलेली अनुभूती

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडे पहातांना मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते आणि ‘ते चैतन्य माझ्याकडे येत आहे’, असे मला जाणवले. हे चैतन्य इतक्या मोठ्या प्रमाणात येत होते की, त्यांनी आरंभी मला काही विचारले, तरी त्याचे उत्तर देण्यासाठी माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ०

– कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ (वय १५ वर्षे), पुणे (वर्ष २०२१)

मुलगी आश्रमात आल्यावर मनात आलेल्या विचाराप्रमाणे तिचे आश्रमातील साधकांच्या भेटीचे नियोजन आपोआप होणे आणि त्या वेळी गुरुदेवांचे स्मरण होऊन भावजागृती होणे

‘माझी मुलगी कु. आर्या जवळपास ६ वर्षांनंतर रामनाथी आश्रमात येणार असल्याने ‘तिच्या आश्रमभेटीच्या वेळी तिचे काही साधकांशी भेटण्याचे नियोजन करायला हवे’, असा विचार सकाळी माझ्या मनात आला होता. नंतर एक सेवा आल्याने याविषयी माझे कोणाशी बोलणे न झाल्याने मी तसे नियोजन करू शकलो नाही; मात्र गुरुदेवांच्या अगाध कृपेने माझ्या मनात आलेल्या विचाराप्रमाणे तिचे साधकांशी भेटण्याचे नियोजन आपोआप झाले. तेव्हा ‘तुम्ही सर्व साधक आणि तुमचे कुटुंबीय यांचेही दायित्व माझ्यावर आहे’, या गुरुदेवांच्या वचनाचे स्मरण होऊन माझी भावजागृती झाली अन् माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– प्रा. महावीर श्रीश्रीमाळ (वडील), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

पुणे येथे झालेल्या ‘ऑनलाईन’ युवा साधक सत्संगा’त भावप्रयोग घेतला जात असतांना आलेल्या अनुभूती

१. ‘काही वेळा मला मोगर्‍याचा सुगंध आला.

२. मला शंखनाद ऐकू आला.

३. ‘मी श्रीकृष्णाच्या बासरीची धून ऐकत आहे’, असे मला जाणवले.’

– कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ (वय १५ वर्षे), पुणे (वर्ष २०२१)