भारताचे वेगळेपण !

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांची पात्रता !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील ‘देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने ‘वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शिक्षणात माणुसकी न शिकवल्याचा परिणाम !

‘शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही शिक्षणात माणुसकी न शिकवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात जनतेला लुबाडणारे व्यावसायिक आणि नोकरी करणारे निर्माण झाले आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जागृत हिंदूंना दिशा देणे आवश्यक !

‘कृतीशील हिंदूंनो, झोपलेल्या हिंदूंना जागृत करण्यात वेळ न घालवता आता जागृत हिंदूंना दिशा देण्याचे कार्य करा, तरच तुम्ही जवळ आलेल्या आपत्काळात वाचाल आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकाल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आगामी ‘हिंदु राष्ट्रा’त सरकारी नोकरीसाठीचा निकष !

‘पोलीस आणि सैन्य यांचीच नव्हे, तर प्रशासनातील सर्वांचीच भरती करतांना हिंदु राष्ट्रात ‘राष्ट्र अन् धर्म यांवरील प्रेम’ हा सर्वांत मोठा घटक समजण्यात येईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताची शोकांतिका !

‘भ्रष्टाचार उघडकीस आणणारे प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी दाखवा आणि १ लाख रुपये घ्या’, असे उद्घोषित केले, तरी कुणाला ते पारितोषिक कधी मिळेल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संतांच्या तुलनेत राजकारण्यांचे महत्त्व शून्य !

‘राजकारणी जनतेला पैसे देऊन आणि वाहनाची सोय करून सभेला बोलावतात. याउलट संतांकडे आणि धार्मिक उत्सवात न बोलावताही भक्त लाखोंच्या संख्येने येतात अन् पैसे अर्पण करतात ! यावरून संतांच्या तुलनेत ‘राजकारण्यांचे महत्त्व शून्य आहे’, हे लक्षात येईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि विज्ञाननिष्ठांना अतिशय मर्यादित ज्ञान असण्याची कारणे

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांत आणि विज्ञाननिष्ठांत ‘मला कळते, तेच सत्य’, असा अहंकार असतो आणि नवीन जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. त्यामुळे त्यांना असलेले ज्ञान अतिशय मर्यादित असते. त्यांना अनंताचे ज्ञान कधीच मिळत नाही. याउलट ऋषींना अहंकार नसल्याने आणि जिज्ञासा असल्याने त्यांची ज्ञानकक्षा वाढत वाढत जाते आणि ते अनंत कोटी ब्रह्मांडांचेही अनंत ज्ञान सांगू शकतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हल्लीच्या पिढीची कृतघ्नता !

‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी कृतघ्न झालेल्या हल्लीच्या पिढीला आई-बाबांची मालमत्ता हवी असते; पण वृद्ध झालेल्या आई-बाबांची सेवा करायची नसते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जागतिक लोकसंख्येचा परिणाम !

पृथ्वीची क्षमता ३०० कोटी मानवांचे पालन-पोषण करण्याएवढी आहे. आता पृथ्वीवरील मानवांची संख्या ८०० कोटी झाली आहे. त्यामुळे पुढे रॉकेल, पेट्रोल, गॅस, पाणी, अन्न एवढेच नव्हे, तर शुद्ध हवाही मानवाला आवश्यकएवढी मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवजातही नष्ट होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले