राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दीपोत्सव उपक्रम !
पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बिजलीनगर परिसरातील ‘विश्वेश्वर सायम् शाखे’चे स्वयंसेवक गेल्या १६ वर्षांपासून लोकसहभागातून दीपोत्सव साजरा करून सामाजिक संदेश देत असतात. या वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य आणि केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याविषयी त्यावर आधारित दिव्यांची आरास करून अनोखा सामाजिक संदेश देत अहिल्यादेवींना मानवंदना अर्पित केली आणि केंद्र सरकारचे धन्यवाद व्यक्त केले. या दीपोत्सवात परिसरातील बाल, महिला, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी उपस्थित नागरिकांना आगामी निवडणुकीत आपला हक्क बजावून हिंदुत्वासाठी १०० टक्के मतदान करण्याचेही आवाहन करण्यात आले. दीपोत्सव उपक्रमामुळे बिजलीनगर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला होते.