मलकापूर-शाहूवाडी वैद्यकीय संघटनेच्या वतीने श्री धन्वन्तरि जयंतीच्या निमित्ताने मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे सोहळा साजरा !

श्री धन्वन्तरि जयंती सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित मान्यवर

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – रुग्णांनी स्वतःचे आरोग्य उत्तम राहावे यांसाठी, तर समस्त वैद्यकीय व्यावसायिकांनी उत्तम चिकित्सक बनण्यासाठी श्री धन्वन्तरि देवतेची उपासना करुन कृपादृष्टी संपादन करावी. आयुर्वेदाची परंपरा जोपासत आयुर्वेदतज्ञांनी पंचगव्य चिकित्सा पद्धतींचा अभ्यास करून स्वत:ची संशोधक बुद्धी अखंड राखावी. आधुनिक चिकित्सा पद्धती, होमिओपॅथी, आयुर्वेद या सर्व चिकित्सा पद्धतींचा वापर मानवी आरोग्य संतुलित राखण्यासाठी व्हावा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी यांनी केले. मलकापूर-शाहूवाडी वैद्यकीय संघटनेच्या श्री धन्वन्तरि जयंतीचा सोहळा साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

श्री धन्वन्तरि देवतेच्या पूजनानंतर ‘श्री धन्वन्तरये नमः’, असा नामजप करण्यात आला. शंखनादानंतर आरती पार पडली. यानंतर मनोगत व्यक्त करून सोहळ्याची सांगता झाली. वैद्य भूषण पाटील यांनी सर्वांना धन्वन्तरि जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संघटनेचे सचिव वैद्य प्रसाद कुलकर्णी, वैद्य मनोहर पाटील, वैद्य भरत पाटील, वैद्य जगन्नाथ पाटील, वैद्य नीलेश बसरे, वैद्य अभिजित यादव, वैद्या (सौ.) मोहिनी अंबिके, सौ. अल्पश्री पाटील, औषधी आस्थापन संघटनेचे शाहुवाडी तालुकाध्यक्ष श्री. शिवाजी दळवी, श्री. वसंतराव चव्हाण उपस्थित होते.