परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही; कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात राज्य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाने हिंदूंना हिंदु धर्म आणि साधना न शिकवल्यामुळे देशात भ्रष्टाचार अन् सर्व प्रकारचे गुन्हे पुष्कळ वाढले आहेत, हे एकाही सरकारला कळले कसे नाही ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

आता तरी बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे डोळे उघडतील का ?

‘कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती हानीकारक आहेत’, हे विज्ञानाने सिद्ध केल्याने हिंदु धर्मात सांगितलेली प्रत्येक गोष्ट कशी विज्ञानाला धरून असते, हे सिद्ध झाले आहे. आता तरी बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे डोळे उघडतील का ?’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे नोबेल पारितोषिक मिळवणारे, तर कुठे ऋषि-मुनी !

‘नोबेल पारितोषिक मिळवणार्‍यांची नावे काही वर्षांतच विसरली जातात; पण धर्मग्रंथ लिहिणारे वाल्मीकि ऋषि, महर्षि व्यास, वसिष्ठ ऋषि इत्यादींची नावे युगानुयुगे चिरंतन रहातात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारून विनाशाच्या खाईत चाललेला समाज !

हिंदूंनी पाश्चात्त्य संस्कृतीचा अंगीकार केल्यामुळे २ पिढ्यांतील, म्हणजेच आई-वडील अन् मुलगा-सूनही एकमेकांशी समरस होऊ शकत नाहीत.

श्रीमद्भगवद् गीतेचे महत्त्व

गीतेमधील श्लोक आपण कितीही वेळा वाचले किंवा अभ्यासले, तरी प्रत्येक श्लोकातील मर्म त्या वेळी लक्षात येतेच, असे नाही.

भक्तांच्या संदर्भात कलियुगातील बुद्धीप्रामाण्यवाद्यांची स्थिती !

‘जो आवडतो देवाला । तोची नावडे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना !’