जिलेटिनच्या कांड्या सापडलेल्या गाडीच्या क्रमांकांच्या पाट्या केलेल्या दुकानातील सीसीटीव्ही चित्रण सचिन वाझे यांनी नेले ! – दुकानदाराची माहिती

या माहितीमुळे संबंधित प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. २४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत सचिन वाझे यांसह अन्य ५ लोक दुकानात आले होते. त्यानंतर दुसर्‍यावेळीही काही जण आले होते;…

परभणी येथे संचारबंदीत किरकोळ वाहतूक चालू, तर व्यापार्‍यांचा कडकडीत बंद !

विवाह कार्य, मोर्चे, निदर्शने आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांवरही ३१ मार्चपर्यंत बंदी

आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील पथकर नाक्यावरील कर्मचार्‍यास मारहाण

वादग्रस्त पथकर नाका म्हणून ओळख असणार्‍या आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील पथकर नाक्यावरील कर्मचार्‍यास अज्ञात टोळक्याने मारहाण केली आहे. या मारहाणीचे ध्वनिचित्रीकरण सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रसारित झाले आहे.

नीतेश राणे यांच्या आरोपात तथ्य नाही, कायदेशीर नोटीस देणार ! – वरुण सरदेसाई, शिवसेना

‘आय्.पी.एल्.’ स्पर्धेत बेटिंगवाल्यांकडून हप्त्याचा वाटा मिळावा, यासाठी वरूण सरदेसाई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या संपर्कात होते, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला होता. यावर वरुण सरदेसाई यांनी उत्तर दिले.

कोरोना लसीकरणाच्या नावाखाली कुणीही आधारकार्ड क्रमांक, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

भ्रमणभाषवर आधारकार्ड क्रमांक, ओटीपी मागितला जात नसल्याचे शासन-प्रशासन, इत्यादींनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आर्थिक फसवणूक होऊ देऊ नका !

उत्तर कोपर्डे (जिल्हा सातारा) येथील खासगी सावकारी करणार्‍यास अटक

अनधिकृतपणे खासगी सावकारी करणारे विजय उपाख्य विराट विलास चव्हाण यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले.

श्रीरामकृष्ण बोधामृत

ईश्‍वर असून सर्व कर्तृत्व त्याचेच आहे, हे सत्य जाणून संपूर्ण शरणागती पत्करावी, हेच मनुष्यास योग्य आणि हितकारक आहे; म्हणून हेच आचरणात आणावे. हाच मनुष्यजन्माचा उद्देश आहे.

अभिनेते कमल हासन यांच्या गाडीवर तरुणाकडून आक्रमण 

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रसार चालू असतांना अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम (एम्.एन्.एम्.) या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष  कमल हासन यांच्या गाडीवर एका तरुणाने आक्रमण केले.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

ठाकरे सरकार राज्यातील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरत आहे.-खासदार नारायण राणे

अधिकोषात काम करणारे सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक २ दिवसाच्या संपात सहभागी !

१५ आणि १६ मार्च या दिवशी असणार्‍या संपात ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशनसह ९ संघटना सहभागी होत आहेत.