कोरोना लसीकरणाच्या नावाखाली कुणीही आधारकार्ड क्रमांक, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘सध्या कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी आधारकार्ड क्रमांक किंवा भ्रमणभाषवर ‘ओटीपी’ (वन टाईम पासवर्ड) पाठवून तो मागितला जात आहे. हा ‘ओटीपी’ दिला की, तुमचे नाव लसीकरणासाठी रजिस्टर होईल’, असे सांगितले जात आहे. असे असले, तरी चुकूनही तुमचा आधारकार्ड क्रमांक, ‘ओटीपी’ कुणालाही देऊ नका अन्यथा तुमच्या अधिकोषातील (बँक खात्यातील) पैसे काढले जाऊन खाते रिकामे होऊ शकते. सावध रहा. काळजी घ्या. अशा कारणांनी दूरभाष आल्यास बोलू नका’, अशी चेतावणी महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने देण्यात येत आहे.

वास्तविक पहाता कोणत्याच कारणाने नागरिकांना भ्रमणभाषवर आधारकार्ड क्रमांक, ओटीपी मागितला जात नसल्याचे शासन-प्रशासन, इत्यादींनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भूलथापांना प्रतिसाद देऊन स्वत:ची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नका !