संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलातील नवीन सिद्ध केलेला कृत्रिम धावमार्ग केवळ पाचच दिवसांत उखडला !

धावमार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होणे यात भ्रष्टाचार झाला नसेल कशावरून ? कोट्यवधी रुपये खर्चून सिद्ध केलेला धावमार्ग पाचच दिवसांत कसा उखडतो ? अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी करणार्‍यांकडून पैसे वसूल करायला हवेत !

पुणे येथील खडकवासला जलाशय रक्षण अभियानाची यशस्वी सांगता !

हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि समविचारी संघटना यांच्या वतीने संयुक्तरित्या राबवलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची यशस्वी सांगता ३० मार्च या दिवशी करण्यात आली.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराची निवड नाही !

याच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांनी वेळोवेळी या मतदारसंघावर आपला दावा केला आहे. त्यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचेही स्पष्ट केले; पण त्या जागेवर अद्याप उमेदवार ठरला गेलेला नाही.

नागपूर येथे रश्मी बर्वे यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे उमेदवार !

४६ वर्षीय बर्वे यांनी स्वत:च्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि शेतीपूरक व्यवसाय असा दाखवला आहे. यातून वर्षाला ११ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळणार्‍या बर्वे यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सव्वाचार कोटी रुपयांहून अधिक आहे.

शरद पवार यांच्या पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली सूची घोषित !

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याविषयीची माहिती दिली.

नवी मुंबईमध्ये ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

बांगलादेशी घुसखोरांची समस्या समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

अकोला : पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६० हून अधिक महिला पोलिसांची प्रकृती बिघडली !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही जनतेला शुद्ध पाणी पुरवू न शकणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

कर्णकर्कश ‘डीजे’ला प्रतिबंधित करा !

कथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना ‘डीजे’चा आवाज ऐकू येत नाही का ? ते यावर कारवाई करण्याची मागणी का करत नाहीत ?

‘श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील दागिने अपहार प्रकरणाचे अन्वेषण योग्य दिशेने !’ – नीलेश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी

३ महिन्यांनंतरही आरोपी न सापडणे, हेच पोलिसांचे योग्य अन्वेषण म्हणायचे का ? देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्‍यांनी शिक्षा कधी होणार ? याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे !

केलेल्या विकासकामांच्या जोरावर माझा विजय निश्चित ! – संजय मंडलिक, खासदार, शिवसेना

पंचगंगा नदी प्रदूषण दूर करणे, श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्याला गती देणे यांसह कोल्हापूरच्या विकासाची अनेक महत्त्वाची कामे यापुढील काळात केली जातील, असे प्रतिपादन कोल्हापूर मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले.