दबावतंत्र असते तर संजय राऊतही भाजपमध्ये आले असते ! – विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप

पुणे येथे पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते. विनोद तावडे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे सुडाचे राजकारण करत नाहीत, अन्यथा ते मुख्यमंत्री झाले असते.

आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून सभेला न जाण्याच्या नोटिसा ! – डॉ. अमोल कोल्हे

करंदी या गावातील ‘महाविकास’ आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमांतून सभेला जाऊ नये, अशा नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, असा आरोप ‘महाविकास आघाडी’चे लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाकडून दिव्यांग मतदारांसाठी ‘सक्षम ॲप’ !

देशातील अधिकाधिक दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, तसेच मतदान केंद्रावर पोचून त्यांना मतदान करणे सोपे आणि सोयीचे होण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सक्षम ॲप’ सिद्ध केले आहे.

धुळे येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांचे उमेदवारी आवेदन अवैध !

शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा न्यायप्रविष्ट निर्णय पूर्ण न झाल्याने निवडणूक आयोगाने अब्दुल रहमान यांचे उमेदवारी आवेदन छाननीअंती अवैध ठरवले आहे.

नागपूर येथे भूकंपाचे सौम्य धक्के; २.५ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद !

शहरात ३ मे या दिवशी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. महिनाभराच्या अंतरात येथे बसलेला हा सलग दुसरा भूकंपाचा धक्का आहे. नागपूर परिसरात २.५ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे

जळगाव येथे बनावट देशी मद्याचे उत्पादन करणारा कारखाना प्रशासनाकडून उद्ध्वस्त !

शीतपेय बनवण्याच्या नावाखाली बनावट देशी मद्य बनवून त्याची बाजारात अनधिकृतपणे विक्री होत आहे’, अशी गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली.

कठोर नियमांमुळे पुणे शहरातील ३५ हून अधिक रुग्णालये बंद !

नियम जनतेच्या सोयीसाठी कि गैरसोयीसाठी ? असा प्रश्न निर्माण करणारी घटना ! असे नियम कुणी बनवले हे पहाणे आवश्यक !

पुणे येथे बसमध्ये अश्लील चित्रफीत दाखवून धर्मांधाकडून तरुणीचा विनयभंग !

अत्यंत खालच्या स्तराला जाणारे धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत !

महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज मिरज येथे पदयात्रेचे आयोजन !

सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ ५ मे या दिवशी सकाळी १० वाजता मिरज येथे महायुतीच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सोंटू जैन याची मालमत्ता मोजण्यासाठी ताबा घेण्यापूर्वी ४० कोटी रुपये जमा करा !

गेल्या वर्षी जुलै मध्ये नागपूर पोलिसांनी गोंदिया येथील कथित बुकी सोंटू जैन याच्या घरी धाड टाकून १७ कोटी रोख आणि २ कोटी ४४ लाख रुपयांचे सोने-चांदी जप्त केली होती.