पुणे येथे बसमध्ये अश्लील चित्रफीत दाखवून धर्मांधाकडून तरुणीचा विनयभंग !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – पी.एम्.पी.एम्.एल्. बसमधून प्रवास करणार्‍या तरुणीला अश्लील स्पर्श करून अश्लील चित्रफिती दाखवून विनयभंग करणार्‍या गुलाम हुसेन महमंद इदरीस याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुलाम हा उत्तरप्रदेशचा असून सध्या वारजे माळवाडी येथे रहात आहे. हा प्रकार ३ मे या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता घडला. या प्रकरणी पीडिताने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

संपादकीय भूमिका :

अत्यंत खालच्या स्तराला जाणारे धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत !