हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी युवकांनी हनुमानाचे गुण अंगीकारावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हनुमान रामभक्तांच्या समोर नम्रपणे हात जोडून उभे रहायचे आणि असुरांच्या समोर त्यांचे महाबली रूप प्रकट व्हायचे. सध्या हनुमानाची उपासना करतांना आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांचे गुण अंगिकारले पाहिजेत, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाकडून ‘लवासा’ प्रकरणी शरद पवार यांच्यासह ५ जणांना नोटीस !

४ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

मध्यप्रदेशातील तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले मिर्ची बाबा यांना बलात्काराच्या प्रकरणी अटक

मध्यप्रदेश पोलिसांनी तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले वैराग्य नंद गिरि महाराज उपाख्य मिर्ची बाबा यांना बलात्काराच्या आरोपावरून ग्वॉल्हेर येथून अटक केली.

आतंकवाद्याच्या सुटकेसाठी केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून संयुक्त अरब अमिरातच्या दूतावासाला साहाय्य !

केंद्रशासनाने या आरोपाकडे गांभीर्याने पाहून याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, असेच जनतेला वाटते !

पंजाबमध्ये दोघा खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशाला आतंकवादाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागतो, हे लज्जास्पद !

‘हम दो हमारे बारह’ या आगामी हिंदी चित्रपटाला मुसलमानांचा विरोध

भारताच्या लोकसंख्यावाढीमध्ये मुसलमानांची गती अधिक असल्याचे यापूर्वीच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. त्यामुळे जर कुणी ‘त्यांची लोकसंख्या वाढत आहे’, असे म्हटले, तर ते चुकीचे कसे ?

भाग्यनगर येथे भाजपच्या नेत्याचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

तेलंगाणामधील भाजपचे नेते ज्ञानेंद्र प्रसाद त्यांच्या रहात्या घरी ८ ऑगस्टच्या सकाळी मृतावस्थेत आढळून आले. प्रसाद यांनी आत्महत्या केली कि त्यांची हत्या करण्यात आली ?, यासंदर्भात तपास चालू आहे.

भोपाळमधून दोघा बांगलादेशी आतंकवाद्यांना अटक

अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा !

पोलीस हवालदाराच्या हत्येच्या प्रकरणी माजी खासदाराला २७ वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा

एका पोलीस हवालदाराच्या हत्येच्या २७ वर्ष जुन्या प्रकरणात बहुजन समाज पक्षाचे माजी खासदार उमाकांत यादव यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यादव यांच्यासह न्यायालयाने एकूण ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिरात चोरी

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथील पाटण गावातील प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिरात चोरी करण्यात आल्याच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.