भाग्यनगर येथे भाजपच्या नेत्याचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

हत्या कि आत्महत्या ?, याचा तपास चालू !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

भाग्यनगर – तेलंगाणामधील भाजपचे नेते ज्ञानेंद्र प्रसाद त्यांच्या रहात्या घरी ८ ऑगस्टच्या सकाळी मृतावस्थेत आढळून आले. प्रसाद यांचा मृतदेह पंख्याला लटकल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रसाद यांनी आत्महत्या केली कि त्यांची हत्या करण्यात आली ?, यासंदर्भात तपास चालू आहे.

ज्ञानेंद्र प्रसाद हे सरलिंगमपल्ली मतदारसंघातील पक्षाच्या राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य होते. भाग्यनगर येथील मियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्ञानेंद्र प्रसाद यांचे घर आहे.