‘हम दो हमारे बारह’ या आगामी हिंदी चित्रपटाला मुसलमानांचा विरोध

चित्रपटाच्या भित्तीपत्रकावर दाखवले १२ जण असलेलेे मुसलमान कुटुंब !

‘हम दो हमारे बारह’ या आगामी हिंदी चित्रपटाचे भित्तीपत्रक

मुंबई – ‘हम दो हमारे बारह’ या आगामी हिंदी चित्रपटाचे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले आहे. त्यात एका मुसलमान कुटुंबाचे छायाचित्र दिसत आहेत. त्यात एकूण १२ जण दाखवण्यात आले आहेत. या भित्तीपत्रकाच्या खाली ‘लवकरच चीनला मागे टाकू’, असे लिहिले आहे. लोकसंख्या वाढीवर आधारित हा चित्रपट असल्यामुळे मुसलमानांकडून याला आक्षेप घेण्यात आला आहे.

१. या चित्रपटाचे दिग्दर्शक कमल चंद्रा यांनी टीकाकारांना संयम राखण्यास सांगत ‘हा चित्रपट कोणत्याही विशिष्ट समुदायावर आधारित नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

२. याविषयी पत्रकार राणा अयुब यांनी चित्रपटाचे भित्तीपत्रक ट्विटरवर प्रसारित करत एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, ‘अशा चित्रपटाला केंद्रीय परिनिरीक्षण मंडळ अनुमती कशी देते ? चित्रपटात मुसलमान समाजाला लक्ष्य करण्यात आले आहे. एका मुसलमान कुटुंबाचे छायाचित्र वापरून त्यावर ‘हम दो हमारे बारह’ असे शीर्षक देणे म्हणजे ‘इस्लामोफोबिया’ (मुसलमानांविषयीचा द्वेष) आहे.’

संपादकीय भूमिका

  • भारताच्या लोकसंख्यावाढीमध्ये मुसलमानांची गती अधिक असल्याचे यापूर्वीच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. त्यामुळे जर कुणी ‘त्यांची लोकसंख्या वाढत आहे’, असे म्हटले, तर ते चुकीचे कसे ?
  • भारताच्या फाळणीच्या वेळी ३ टक्के असणारे मुसलमान आज १४ टक्के झाले आहेत, तर हिंदू त्या तुलनेत न्यून होत आहेत, हे कशाचे द्योतक आहे ?