मध्यप्रदेशातील तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले मिर्ची बाबा यांना बलात्काराच्या प्रकरणी अटक

माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग (डावीकडे) आणि आरोपी मिर्ची बाबा

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश पोलिसांनी तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले वैराग्य नंद गिरि महाराज उपाख्य मिर्ची बाबा यांना बलात्काराच्या आरोपावरून ग्वॉल्हेर येथून अटक केली. पीडित विवाहित महिलेचा आरोप आहे की, मिर्ची बाबा यांनी मूल जन्माला येण्यासाठी गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर बलात्कार केला. या महिलेच्या विवाहाला ४ वर्षे होऊनही तिला मूल होत नव्हते, म्हणून ती मिर्ची बाबांकडे गेली होती.