डफळापूर (जिल्‍हा सांगली) येथील मूर्तीविक्रेत्‍यांकडून दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक भेट !

येथील मूर्तीविक्रेते श्री. रोहित वाठारे आणि श्री. आशिष मोहिते यांनी हिंदु, तसेच गणेशभक्‍तांना शास्‍त्र समजावे; म्‍हणून दैनिक ‘सनातन प्रभात’चा श्री गणेशचतुर्थी विशेषांक प्रत्‍येक मूर्तीसमवेत भेट दिला. त्‍यांनी ४५० अंकांचे वितरण केले.

‘लव्‍ह जिहाद’ हा हिंदु धर्मावरील भीषण आघात ! – सौ. सीमा मानधनिया, हिंदु जनजागृती समिती

‘लव्‍ह जिहाद’ हा हिंदु धर्मावरील भीषण आघात असून ‘लव्‍ह जिहाद’ची भयावहता लक्षात घेऊन प्रत्‍येक हिंदु कुटुंबातील महिला शिक्षणासमवेत धर्मशिक्षित व्‍हायला हवी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्‍या सौ. सीमा मानधनिया यांनी केले.

विसर्जनासाठी वरिष्‍ठ पातळीवरून येणार्‍या आदेशांचे पालन करावे लागते ! – पोलीस अधीक्षक

बळजोरी पुढील दिवसांमध्‍ये घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांवर करू नये, या मागणीसाठी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली.

मुंबईमध्‍ये धर्मांधाकडून अल्‍पवयीन मुलीवर धावत्‍या टॅक्‍सीत बलात्‍कार !

जानेवारी ते ऑगस्‍ट २०२३ या कालावधीत मुंबईमध्‍ये महिलांचा विनयभंग आणि छेडछाड यांच्‍या १ सहस्र २५४ घटना नोंदवण्‍यात आल्‍या आहेत. अन्‍य राज्‍यांतील शहरांच्‍या तुलनेत हे प्रमाण ४ पटीने अधिक आहे. यामध्‍ये बलात्‍काराच्‍या ५४९ घटनांचा समावेश आहे. 

नाशिक जिल्‍ह्यात कांदा लिलाव बंद, सर्व १७ बाजार समित्‍यांना टाळे !

कांदा व्‍यापार्‍यांनी विविध मागण्‍यांसाठी लासलगावसह नाशिक जिल्‍ह्यातील १७ बाजार समित्‍यांमधील लिलावात २० सप्‍टेंबरपासून सहभागी न होण्‍याचा निर्णय घेतला आहे. लिलाव बंदमुळे शेतकर्‍यांची कोंडी झाली असून अंदाजे ३० ते ४० कोटी रुपयांची उलाढाल थंडावली आहे.

पालघर येथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतांना ३ जणांचा बुडून मृत्‍यू !

वाडा तालुक्‍यातील कोणसई गावात ओहळावर आस्‍थापनातील श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतांना जगन मौर्य (वय ३८ वर्षे) आणि सुरज प्रजापति (वय २५ वर्षे) या परप्रांतियांचा बुडून मृत्‍यू झाला.

श्री गणेशमूर्तीदान मोहिमेस सक्‍ती करू नका !

पन्‍हाळा तालुक्‍यातील कोडोली ग्रामपंचायत कार्यालयात श्री गणेशमूर्तीदान मोहिमेस सक्‍ती करू नये; म्‍हणून ग्रामसेवक श्री. जयवंत विष्‍णु चव्‍हाण आणि श्री. प्रकाश पाटील यांना निवेदन देण्‍यात आले.

पनवेलमधील लेडीज बारवर धाड

पनवेल तालुका पोलिसांनी स्‍वतःच्‍या हद्दीतील २ लेडीज बारवर नुकतीच धाड टाकून ३४ महिला, तसेच २३ अन्‍य लोक, तसेच व्‍यवस्‍थापक, नोकर आणि ग्राहक अशा ५७ व्‍यक्‍तींना कह्यात घेतले.

हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांचे शास्‍त्रानुसार पंचगंगा नदीत दीड दिवसांच्‍या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

यंदा प्रशासनाने नदीकाठी छोटी कृत्रिम कुंड बसवली होती, तसेच मूर्तीदान ऐच्छिक ठेवले होते. भाविकांनी मात्र पंचगंगा नदीत विसर्जन करण्‍यासच पसंती दर्शवली. मूर्तीदानही अत्‍यल्‍प प्रमाणात झाले.

पिंपरी-चिंचवड विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्‍णवाहिका सज्‍ज !

शास्‍त्राप्रमाणे वहात्‍या पाण्‍यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन हे पर्यावरणपूरकच आहे.