पुणे येथील लाचखोर वैद्यकीय अधिष्ठात्याची पालिका सेवेतून हकालपट्टी !

पुणे महापालिकेच्या ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालया’चे अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांना १६ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांची आता महापालिका सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

गोवा : माहिती आणि प्रसिद्धी खात्यात श्री सत्यनारायण महापूजा 

प्रतिवर्षी श्रावण मासात ही पूजा या खात्यात साजरी केली जाते. यावर्षी या वार्षिक श्री सत्यनारायण पूजेचे यजमानपद श्री. पुरुषोत्तम परवार आणि सौ. पूनम परवार यांनी भूषवले. सकाळी पूजा, त्यानंतर आरती, भजन, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद झाला.

यवत (जि. पुणे) येथे ‘वरिष्ठ पोलीस अधिकारी’ असल्याचे सांगून महिलेवर ९ वर्षे अत्याचार !

धमकी देत ३५ लाख रुपये घेतले

वणी (यवतमाळ) येथे देहविक्री व्यवसायातील २ मुलींची सुटका !

गेल्या ८ मासांत ६ प्रकरणांतून वणी पोलिसांनी ११ जणांवर कारवाई करत २ पीडित मुलींची सुटका केली.

ठाणे येथील पनीर उत्पादकांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई !

या कारवाईत सुमारे ४ लाख १ सहस्र ३७४ रुपये किंमतीचे पनीर, दूध आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया यांसह साथीच्या आजारांमुळे नागरिक त्रस्त !

यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत; मात्र प्रमाण वाढतच आहे. आरोग्य विभागाने डासांची उत्पत्ती होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे, तसेच हलगर्जीपणा न करण्याचे आवाहन केले आहे.

पुण्‍यात दहीहंडीसाठीच्‍या ध्‍वनीवर्धक व्‍यवस्‍थेचे ‘स्‍टेज’ कोसळले !

पांगळु आळी येथे श्रीकृष्‍ण मंडळाच्‍या दहीहंडीसाठी ध्‍वनीवर्धक व्‍यवस्‍था उभारत असतांना दुचाकीचा धक्‍का लागून ‘स्‍टेज’ कोसळले.

पोपटांची तस्‍करी करणार्‍या ३ मुसलमानांना अटक : ५०० पोपट जप्‍त

उत्तरप्रदेश पोलिसांच्‍या विशेष कृती दलाने पोपटांच्‍या तस्‍करीच्‍या प्रकरणी बंगालमधील महंमद वसीम उपाख्‍य अरमान, महंमद आसिफ आणि इंजमाम यांना अटक केली आहे. या पोपटांची तस्‍करी तांत्रिक विधी, तसेच अन्‍य कामांसाठी केली जाते. हे तिन्‍ही तस्‍कर पोपटांना पकडून बिहार, बंगाल, ओडिशा आदी राज्‍यांमध्‍ये तस्‍करी करत होते. 

‘फणस किंग’ मिथिलेश देसाई यांचा लंडनच्‍या आस्‍थापनासमवेत करार

जिल्‍ह्यातील लांजा येथील ‘फणस किंग’ म्‍हणून ओळखले जाणारे मिथिलेश देसाई यांच्‍या ‘जॅक फ्रूट ऑफ इंडिया’ या आस्‍थापनाने लंडनमधील ‘सर्क्‍युलरिटी इनोव्‍हेशन हब’ (‘CIH’) या आस्‍थापनासमवेत अर्थव्‍यवस्‍थेला चालना देण्‍यासाठी महत्त्वाचा सामंजस्‍य करार केला आहे.