सूक्ष्मस्तरावर कार्य करणारे एकमेवाद्वितीय !

‘जेव्हा जेव्हा अधर्म बळावतो, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो आणि धर्माची पुनर्स्थापना करतो’, असे श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. भगवान श्रीकृष्णाचे पूर्ण चरित्र पाहिल्यास त्यात विविध गोष्टी अंतर्भूत आहेत.

दिवाळखोरीची बिकट वाट !

गेल्या काही मासांपासून आपण श्रीलंकेची दिवाळखोरीकडे होणारी वाटचाल पहात आहोत. त्यात आता आणखी काही देशांची भर पडत आहे. अर्थात्च यांतील एक देश म्हणजे भारताचा शत्रू असणारा पाकिस्तान ! हा देशही आता दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहे.

कुतूबमिनार नव्हे, सूर्यस्तंभ !

देश ‘स्वच्छ’ होण्याचा ध्यास घेतलेले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आता पुरातत्व विभागही स्वच्छ करण्यासाठी हा विभाग विसर्जित करून तेथे धर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, खऱ्या इतिहासतज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. असे झाल्यास भारताचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर येण्यास वेळ लागणार नाही आणि हिंदु राष्ट्राच्या दिशेने टाकलेले ते एक पाऊलच असेल !

इस्रोची गगनभरारी !

भारताचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘गगनयान’ची संकल्पना यशस्वी करण्यासाठी ‘इस्रो’ने नुकतेच ‘ह्यूमन रेटेड सॉलिड रॉकेट बूस्टर’चे यशस्वी परीक्षण केले. यामुळे मनुष्याला अंतराळात दीर्घकाळ रहाणे शक्य होणार आहे.

अल्पसंख्यांकवाद !

अशा सोयीच्या अल्पसंख्यांकवादाला वैध मार्गाने विरोध होणे आवश्यक आहे. यासाठी जागरूक पालकांनी केजरीवाल यांच्या या पक्षपाती निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले पाहिजे; कारण बऱ्याचदा असे निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकत नसल्याचा इतिहास आहे. अशांना न्यायालयाकडून चाप मिळाली की, त्यांची ढोंगी धर्मनिरपेक्षता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येईल !

पुन्हा एकदा ‘१९८९’ !

मूठभर जिहादी आतंकवादी गेल्या ३ दशकांहून अधिक काळ भारतातील सर्वपक्षीय सरकारांना आव्हान देतात आणि कुठलेही सरकार त्यांचा मुळासह निःपात करून हिंदूंचे रक्षण करू शकत नाही, हे अत्यंत लाजिरवाणे आहे !

‘ओआयसी’ आणि पाक !

इस्लामी देश अन्य कुठल्याही सूत्रांवरून विभागलेले असले, तरी धर्माच्या सूत्रावरून ते जागतिक स्तरावर एकत्रित येतात, हे यातून स्पष्ट होते. हे लक्षात घेऊन भारताने अंतर राखूनच इस्लामी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करणे आवश्यक !

पुरातत्वीय उदासीनता !

ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भातही पुरातत्व विभागाची भूमिका काय ? न्यायालयात सर्वेक्षणाची मागणी केल्यानंतर ते करण्यात आले. पुरातत्व विभागाने ते स्वतःहून का नाही केले ? ऐतिहासिक वारशांचे केवळ जतन करणे पुरेसे नसते, तर त्या वारशाशी निगडित दबलेला सत्य इतिहास समोर आणण्याचे कर्तव्यही पुरातत्व विभागाचे नाही का ? भारतात तर हे फार महत्त्वाचे आहे !

अमेरिकेतील अंदाधुंदी !

जी अमेरिका स्वत:च्या देशातील वांशिक हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण मिळवू शकत नाही, तिला म्हणे भारताची चिंता ! त्यामुळे अमेरिकेने इतर देशांत नाक खुपसण्याऐवजी स्वत:चीच देशांतर्गत स्थिती सुधारण्याकडे लक्ष देणे तिच्यासाठी हितावह आहे !