विधानसभा निवडणूक २०२४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघांत १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ मतदारसंघांतून ४ नोव्हेंबर या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण ४ जणांनी माघार घेतल्याने १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अर्ज मागे घेण्याची मुदत संपली !; राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याने सरवणकर निवडणूक लढवणार !…

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेण्याचा ४ नोव्हेंबर हा अखेरचा दिवस होता. ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार होते. ही मुदत आता संपली आहे.

वाडे, वास्को येथील तळ्याचे व्यवस्थापन चर्च संस्थेच्या स्वाधीन करण्यास विश्व हिंदु परिषदेचा विरोध

मुरगाव नगरपालिकेने वाडे, वास्को येथील तळ्याचे व्यवस्थापन चर्च संस्थेच्या स्वाधीन करण्याचा ठराव घेतला आहे. मुरगाव नगरपालिकेच्या या निर्णयाला विश्व हिंदु परिषदेच्या मुरगाव विभागाने तीव्र विरोध दर्शवला आहे.

कार्तिकी वारी जवळ येत असतांना इंद्रायणी नदी ऐन दीपावलीत प्रदूषणाच्या विळख्यात !

प्रशासनाच्या लेखी वारकर्‍यांच्या भावनांची किंमत शून्य आहे का ? तसेच एरव्ही हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषणाची ओरड करणारे पुरो(अधो)गामी, तथाकथित पर्यावरणप्रेमी आता कुठे आहेत ?

कोल्हापूर उत्तर भाग विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांचे उमेदवारी आवेदन मागे !

आवेदन भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ४ नोव्हेंबरला राजेश लाटकर यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे अखेर कोल्हापूर उत्तर भाग विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांचे आवेदन मागे घेतले.

सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांचा एन्.डी.ए.मधील प्रवेश वाढवण्यासाठी सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा !

राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा एन्.डी.ए.तील (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील) प्रवेश वाढवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा केली आहे.

रायगड जिल्ह्यात वर्‍हाड आणि टाटाचा माळ येथे हिंदु जनजागृती समितीकडून व्यापार्‍यांचे प्रबोधन !

वर्‍हाड आणि टाटाचा माळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी होण्यासाठी बाजारपेठेतील व्यावसायिकांचे प्रबोधन करण्यात आले. हे अभियान रायगड जिल्ह्यातील जांभूळपाडा, परळी तसेच अन्य भागांत राबवण्यात आले.

पुणे येथील ‘गोखले संस्थे’चे कुलगुरु डॉ. अजित रानडे यांचे त्यागपत्र !

गोखले संस्थेचे अडीच वर्षे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याविषयी डॉ. रानडे यांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यागपत्र दिले. माझी नेमणूक कोणत्याही पद्धतीने त्रुटी किंवा अपात्रता दर्शवत नाही, असेही त्यांनी त्यागपत्रामध्ये नमूद केले.

दीपावलीनिमित्त श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले !

दीपावलीनिमित्त श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. प्रामुख्याने वसूबारस या दिवशी श्री विघ्नहर उद्यानामध्ये असलेल्या गायीचे पूजन करण्यात आले, लक्ष्मीपूजनदिनी श्री विघ्नहराचे अलंकार, तसेच देवस्थान ट्रस्टचे चोपडी पूजन करण्यात आले.

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे स्थानांतर !

रश्मी शुक्ला यांच्या स्थानांतरानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त भार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे देण्यात आला आहे.