मुंबईत अमली पदार्थांची तस्‍करी करणार्‍या ९ जणांना अटक !

मुंबईमध्‍ये कोट्यवधी रुपयांची अमली पदार्थाची तस्‍करी होणे सुरक्षाव्‍यवस्‍थेला लज्‍जास्‍पद ! अशांना कठोर शिक्षा झाल्‍याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

ऐन पावसाळ्‍यात मराठवाड्यातील धरणांत केवळ ४२.७९ टक्‍के पाणीसाठा !

गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत ४३.८८ टक्‍के पाणीसाठ्याची घट झाली आहे. याचा परिणाम जाणवत असून संभाजीनगर आणि जालना येथे ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

‘सनातन प्रभात’मधील लिखाण म्‍हणजे आम्‍ही धर्मगुरूंचा आदेशच समजतो ! – अधिवक्‍ता दत्तात्रय सणस

वर्ष १९९८ पासून ‘सनातन प्रभात’ची वाटचाल चालू आहे. आज ‘साप्‍ताहिक सनातन प्रभात’ला २५ वर्षे पूर्ण होत असून आपण रौप्‍य महोत्‍सवी वर्ष साजरे करत आहोत.

ज्‍येष्‍ठ पत्रकार आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ अरविंद कुळकर्णी यांची प्रकृती स्‍थिर !

ज्‍येष्‍ठ पत्रकार आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांना हृदयविकाराचा सौम्‍य झटका आला होता. आता त्‍यांच्‍यावर उपचार करण्‍यात आले असून त्‍यांची प्रकृती सुधारत आहे.

टँकरमधून गॅसची चोरी करून विक्री केल्‍याप्रकरणी ३ जणांना अटक !    

पोलिसांनी या प्रकरणी एकूण ५२ लाख ६८ सहस्र ८८३ रुपयांचा माल जप्‍त केला आहे. जावेदखान महंमद मुनाफ, शेख अफसर शेख बाबुमियाँ आणि कदीर शेख अब्‍दुल रज्‍जाक अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे आहेत.

हिंदू जागृत झाले, तर विश्‍वातील कुठलीही शक्‍ती हिंदूंच्‍या परंपरांशी खेळू शकणार नाही ! – परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज, स्‍वस्‍तिक पीठाधीश्‍वर, मध्‍यप्रदेश

उज्‍जैन (मध्‍यप्रदेश) येथे भगवान श्री महाकाल यांच्‍या शोभायात्रेमध्‍ये असणार्‍या हत्तीवर ‘पीपल्‍स फॉर एनिमल्‍स’ (पी.एफ्.ए.)चे सचिव प्रियांशु जैन यांनी आक्षेप घेतला आहे. बकरी ईदच्‍या वेळी लाखो बकर्‍यांची हत्‍या केली जाते.

कलियुगात ‘नामस्‍मरण’ ही सर्वश्रेष्‍ठ साधना ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, सनातन संस्‍था

अनेक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्‍या सुखालाच आनंद समजतात; पण खरा आनंद हा अध्‍यात्‍माचे आचरण केल्‍यानेच प्राप्‍त होतो. जीवनातील ८० टक्‍के समस्‍यांचे मूळ कारण हे आध्‍यात्मिक असते.

हिंसाचारात राष्‍ट्रीय संपत्तीची हानी करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – रवींद्र ताथवडेकर, विहिंप

या वेळी सातारा जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्‍यात आले. निवेदनामध्‍ये म्‍हटले आहे की, देहली येथे मोहरमच्‍या मिरवणुकीत नियोजनपूर्वक हिंसाचार करून लहान मुलांच्‍या माध्‍यमातून हिंदू, तसेच शासनाच्‍या बसगाड्या यांवर आणि सार्वजनिक मालमत्तेवर आक्रमणे करण्‍यात आली.

सोलापूरमधील शास्‍त्रीनगर परिसरात २ गटांत दगडफेक !

दगडफेकीचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. दगडफेकीमध्‍ये काही युवक घायाळ झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १० आरोपींच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करत अटक केली आहे.

उन्हाळे (राजापूर) येथील गरम पाण्याच्या झर्‍याच्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारणीसाठी तात्काळ निधी मिळणार !

स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर गरम पाण्याच्या झर्‍याच्या ठिकाणी संरक्षण भिंत आणि कपडे पालटण्याची खोली (चेजिंग रूम) उभारणीसाठी तात्काळ निधी देण्याचे आश्वासित केले.