मसूद अझहरला जागतिक आतंकवादी घोषित करण्याचा प्रस्ताव चीनने पुन्हा नकाराधिकार वापरून फेटाळला

मसूद अझहर याला जागतिक आतंकवादी ठरवण्याच्या संयुक्त राष्ट्रातील प्रस्ताव चीनने नकाराधिकाराचा वापर करून फेटाळून लावला. केवळ व्यावहारिक कारणांमुळेच चीन सातत्याने मसूद अझहर याला वाचवत आहे; मात्र एक दिवस हेच जिहादी आतंकवादी चीनला डसल्याविना रहाणार नाहीत, हे त्याने लक्षात ठेवावे !

वॉशिंग्टन (अमेरिका) येथील विधानसभेला वेदांतील संस्कृत मंत्रपठणाने प्रारंभ

वॉशिंग्टन राज्याच्या ऑलिंपिया या राजधानीत भरलेल्या नवनिर्वाचित विधानसभेच्या बैठकीला वेदांतील संस्कृत मंत्रपठण करून प्रारंभ झाला.

आतंकवाद्यांची आश्रयस्थाने पाकने नष्ट करावीत ! – अमेरिका

अमेरिकेने अनेकदा अशा प्रकारचे आवाहन केलेेले असतांना पाकने प्रत्यक्षात काहीच केलेले नाही, ही वस्तूस्थिती आहे, त्यामुळे असे आवाहन करण्यापेक्षा आता पाकवर थेट कारवाईची आवश्यकता आहे आणि अमेरिकेने त्यासाठी पुढाकार घ्यावा !

अमेरिकेने पाक नागरिकांसाठीच्या व्हिसाची मुदत ५ वर्षांवरून केवळ ३ मासांवर आणली !

अमेरिकेने पाकिस्तानी नागरिकांना मिळणार्‍या व्हिसाच्या मर्यादेमध्ये मोठी घट केली आहे. ही मर्यादा आता ५ वर्षांवरून केवळ ३ मासांवर आणण्यात आली आहे. ही माहिती अमेरिकेच्या उच्चायुक्तालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

(म्हणे) ‘भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयात कर लावणार ! – ट्रम्प यांची चेतावणी

भारत हा अमेरिकेच्या वस्तूंवर सर्वाधिक आयात कर लादणारा देश आहे. अमेरिकेत येणार्‍या भारतीय वस्तूंवरही तसाच अधिकचा आयात कर लागू करण्याचा विचार करत आहोत. भारतीय वस्तूंवर आम्ही जशास तसे न्यायाने १०० टक्के कर लादणार नाही

भारत आणि पाक यांच्यातील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर लवकरच ‘शुभवार्ता’ समजेल ! – डोनाल्ड ट्रम्प

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर एक शुभवार्ता समजेल. दोन्ही देशांतील तणाव वाढत आहे आणि तो अल्प करण्याच्या प्रक्रियेमध्ये अमेरिकाही सहभागी आहे. हा तणाव लवकरच निवळेल, असे दिसत आहे.

भारतीय वैमानिकाला सोडा !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांची नात आणि लेखिका फातिमा भुट्टो यांनी पाकने पकडलेेले भारताचे वैमानिक अभिनंदन वर्थमान यांना सोडण्याची मागणी केली आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये लिहिलेल्या लेखात भुट्टो यांनी म्हटले आहे की, मी आणि अन्य युवक आमच्या पाकिस्तान देशाला आग्रह करतो की

अमेरिकेत बिअरचे नाव ‘हनुमान’ ठेवून देवतेचे विडंबन

विदेशात सातत्याने आणि जाणीवपूर्वक मद्य, शौचालयांचे भांडे, पादत्राणे आदींवर हिंदूंच्या देवतांची नावे आणि चित्रे ठेवून त्यांचा अवमान केला जात आहे. अशांवर कठोर कारवाई होण्यासाठी भाजप सरकारने स्वतःहून प्रयत्न करायला हवेत !

भारत पाकच्या विरोधात कठोर पावले उचलण्याच्या सिद्धतेत ! – डोनाल्ड ट्रम्प

आतापर्यंत स्वतःच्या कणाहीनतेमुळे आणि अमेरिकेच्या दबावामुळे भारताने पाकच्या विरोधात कठोर कारवाई केली नाही, ही वस्तूस्थिती आहे. आता ट्रम्प असे विधान करून पुन्हा भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेच भारतियांना वाटते !

अमेरिकेत भारतियाची हत्या

येथील पेन्साकोला शहरात रहाणारे ४८ वर्षीय भारतीय के. गोवर्धन रेड्डी यांची चेहर्‍यावर मुखवटा लावून आलेल्या अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now