निवडणुकीला उपस्थित कोरोनाबाधित आरोग्य कर्मचारी निलंबित होणार !

कोरोनाबाधित असतांनाही २५ मार्च या दिवशीच्या पतसंस्थेच्या निवडणुकीस उपस्थित असलेल्या जत येथील आरोग्य कर्मचार्‍याच्या निलंबनाचे आदेश  मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले.

शिरवळ (जिल्हा सातारा) प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाच्या आदेशानुसार शिरवळमध्ये (शहर) प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

पुणे येथे उसाच्या वाड्याखाली गोमांस वाहतूक, २ टन गोमांस जप्त !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक आहे. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही कधी करणार ?

राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांची कोरोना रुग्णालयास ‘मास्क’ किंवा ‘पीपीई किट’ न घालता भेट !

पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी रुग्णालयात उपचार चालू असलेल्या कोरोना रुग्णांची ‘मास्क’ किंवा ‘पीपीई किट’ न घालता भेट घेतली. तसेच त्यांच्यासमवेत ‘सेल्फी’ही काढले.

२ दिवस पुरेल इतकीच लस पुणे महापालिकेकडे उपलब्ध !

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, पुणे शहरासाठी अधिकाधिक लस उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार दोघांकडेही पाठपुरावा करणार आहे. शहरातील संसर्ग पहाता लसीकरण अधिक वेगाने होण्याची आवश्यकता आहे.

पुणे येथील उपमहापौर हिराबाई घुले यांच्या मुलासह ७० जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

हिराबाई घुले यांची २३ मार्च या दिवशी शहराच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर उपमहापौरांचा मुलगा चेतन घुले यांनी त्यांच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी करून घोषणाबाजी केली.

केरळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केले घोषणापत्र !

धर्मांतरावर बंदी आणि शबरीमला परंपरांच्या रक्षणासाठी कायदा करण्याचे आश्‍वासन !

तमिळनाडूतील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करा ! – सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे १०० ट्वीट्स करत आवाहन

केवळ तमिळनाडूतीलच नव्हे, तर भारतभरातील मंदिरे ही सरकारीकरणातून मुक्त करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य असून हिंदूंनी त्यासाठी कंबर कसणे आवश्यक !    

लोकसभेमध्ये केवळ १५ खासदारांचीच उपस्थिती १०० टक्के

आता संसदेत उपस्थित रहाण्यावरूनच या लोकप्रतिनिधींना वेतन आणि अन्य भत्ते दिले पाहिजेत. विनाकारण अनुपस्थित रहणार्‍यांकडून दंडही वसूल केला पाहिजे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे !

धर्मांधांच्या या घटनांविषयी भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !