साधू-संत यांचा अवमान करणार्‍यांचा राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने निषेध

हिंदूंनी अशा शासनकर्त्यांना निवडून देणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारल्यासारखे आहे, असे मत राष्ट्रीय वारकरी परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिसर्‍या अतिरिक्त आयुक्तपदी नगरसचिव उल्हास जगताप नियुक्त !

महापालिकेचा ब वर्गात समावेश झाल्याने नवीन आकृतिबंधानुसार महापालिकेत ३ अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत.

‘अ‍ॅपल’चा ‘आयपॅड’ आता भारतात निर्मित होण्याची शक्यता !

भारत सरकारकडून स्मार्टफोन्स निर्यातीला अधिक चालना मिळावी, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेच्या अंतर्गत सुमारे ५० सहस्र कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात येईल, असे घोषित करण्यात आल्याने ‘अ‍ॅपल’ या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहे.

मित्रांच्या सहकार्याने वडिलांची हत्या करणारे अटकेत 

समाजाची नीतीमत्ता किती खालावली आहे, याची ही घटना उदाहरण आहे. समाजाची ही दु:स्थिती दूर करण्यासाठी समाज धर्मशिक्षित करणे आवश्यक आहे.

अंबरनाथ येथील रिपाईच्या माजी शहराध्यक्षांची तहसीलदारांना गोळ्या घालण्याची धमकी !

कायद्याचे भय न वाटणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते निवडून आल्यावर जनतेला न्यायाचे राज्य देतील का ?

२०१२ मध्ये सापडलेल्या सांगाड्यांच्या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा नोंद

गुन्हा नोंद होण्यासच ८ वर्षे लागत असतील, तर संबंधितांना कधी न्याय मिळेल, हे स्वप्नवतच वाटते !

ठाणे येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे तहसीलदारांना निवेदन

देहली शहरातील हिंदुत्वनिष्ठ रिंकू शर्मा यांची क्रूरपणे हत्या करणाार्‍या जिहादी आक्रमणकर्त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन १७ फेब्रुवारी या दिवशी ठाणे येथील नायब तहसीलदार श्री. प्रदीप पळसुले यांना देण्यात आले.

शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे रायगडावर विद्युत् रोषणाई !

डॉ. शिंदे यांनी यासाठी लागणारा निधी मी देतो मात्र रायगड अंधारात ठेवू नका, असे सांगितले आणि तशा मागणीचे पत्र दिले. यानंतर १७ फेब्रुवारी या दिवशी डॉ. शिंदे यांच्याकडून रायगडावर विद्युत् रोषणाईचे साहित्य पोच करण्यात आले. यामुळे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १८ फेब्रुवारी या दिवशी रायगड प्रकाशमान झाला.

राज्यातील गुंडांना ६ मासांत तडीपार करू ! – मुख्यमंत्री

कुख्यात गुंड अन्वर शेख याच्यावर १६ फेब्रुवारीला गुंडांच्या अन्य एका टोळीने आक्रमण केल्यानंतरचे त्यांचे हे वक्तव्य आहे.