जळगाव येथे धर्मांतराचा डाव उधळला !

तुम्‍हाला दुसर्‍या कोणत्‍याही देवाची भक्‍ती करायची आवश्‍यकता नाही’, असे सांगून ग्रामीण भागातील लोकांचा धर्मपरिवर्तन करण्‍याचा डाव ख्रिस्‍ती मिशनर्‍यांनी साधला. विश्‍व हिंदु परिषदेच्‍या कार्यकर्त्‍यांनी सनदशीर मार्गाने पोलिसांचे साहाय्‍य घेऊन धर्मांतराचा डाव उधळून लावला.

सुनील केंद्रेकर यांनी जिल्‍हाधिकारी आस्‍तिक कुमार पांडेय यांच्‍याकडे दिला पदभार !

विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी स्‍वेच्‍छानिवृत्तीसाठी मासाभरापूर्वी केलेल्‍या अर्जाला अपर मुख्‍य सचिवांनी मान्‍यता दिली होती.

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे मूळ राष्‍ट्रवादी काँग्रेसमधून निलंबन !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शरद पवार यांनी ट्‍वीट करून या कारवाईची माहिती दिली आहे. या दोघांवर पक्षविरोधी काम केल्‍याचा ठपका ठेवण्‍यात आला आहे.

विधानसभेच्‍या विरोधीपक्ष नेतेपदी काँग्रेसचा दावा !

अजित पवार यांनी सत्तेत असलेल्‍या भाजप-शिवसेना यांना पाठिंबा दिल्‍यामुळे विरोधी पक्षातील राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या आमदारांची संख्‍या घटली आहे. त्‍यामुळे अजित पवार यांनी त्‍यागपत्र दिल्‍यामुळे रिक्‍त झालेल्‍या विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसने दावा केला आहे.

‘राष्‍ट्रवादी काँग्रेस’ नाव आणि ‘घड्याळ’ पक्षचिन्‍ह आमचेच ! – अजित पवार, उपमुख्‍यमंत्री

जे आमदार माझ्‍यासमवेत आहेत त्‍यांचे भविष्‍य चांगले राहील, याचे दायित्‍व आमच्‍याकडे आहे. राज्‍यात राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्‍ही अधिक बळकट करणार आहोत, असे वक्‍तव्‍य अजित पवार यांनी ३ जुलै या दिवशी मुंबईतील पत्रकार परिषदेत केले.

महाराष्‍ट्र शासन आणणार स्‍वकीय आणि सुलभ २२ सहस्र २५१ मराठी शब्‍दांचा नवीन शब्‍दकोश !

शब्‍दकोश करण्‍यासमवेतच सर्वांनीच दैनंदिन व्‍यवहारामध्‍ये मराठी शब्‍दांचा वापर अधिकाधिक केला, तर मराठी भाषाशुद्धीची चळवळ जोर पकडेल !

शिक्षणाचा दर्जा ढासळल्‍याने आता शिक्षकांचीच ३० आणि ३१ जुलैला परीक्षा !

शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्‍याचा आरोप होत असतांना मराठवाड्याचे विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्‍या विषयांवर सर्वेक्षण करत शिक्षकांची परीक्षा घेण्‍याचा निर्णय घेतला होता. ज्‍यात प्रशासनाकडून मराठवाड्यातील ८ जिल्‍ह्यांत शिक्षकांची परीक्षा घेण्‍याविषयी ठरले होते….

अजित पवार यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट !

या वेळी त्‍यांच्‍यासमवेत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते प्रफुल्ल पटेल, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे उपस्‍थित होते. या भेटीत महायुतीच्‍या पुढच्‍या धोरणाविषयी चर्चा झाल्‍याचे बोलले जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या कर संकलन आणि कर आकारणी विभागाची चांगली कामगिरी !

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने दमदार कामगिरी केली असून ९० दिवसांत ५० टक्‍क्‍यांहून अधिक करदात्‍यांकडून ४४७ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. कर भरून शहर विकासात योगदान देणार्‍या नागरिकांचे आयुक्‍त, तसेच प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले.

अजित पवार गटाकडून राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या प्रदेशाध्‍यक्ष पदावरून जयंत पाटील यांची हकालपट्टी !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्‍यक्ष म्‍हणून सुनील तटकरे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. पक्षाच्‍या वतीने महाराष्‍ट्रातील पुढील निर्णय सुनील तटकरे घेतील, अशी घोषणाही प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.