सानिया बनणार देशाच्या पहिल्या मुसलमान महिला लढाऊ वैमानिक !

येथील सानिया या देशाच्या पहिल्या मुसलमान महिला लढाऊ (फायटर) वैमानिक बनणार आहेत. त्यांनी ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. २७ डिसेंबर २०२२ या दिवशी त्या लढाऊ वैमानिक म्हणून पहिले उड्डाण करतील.

वृंदावन (मथुरा) येथील बांके बिहारी मंदिर पुनर्विकास योजना लागू करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाची संमती

उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशातील भाजप सरकारला मथुरेतील वृंदावन येथील बांके बिहारी मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या भूमीवरील प्राचीन मंदिरांचे संरक्षण करत त्याची प्रस्तावित मंदिर क्षेत्र पुनर्विकास योजना लागू करण्याचा आदेश दिला.

बरेली (उत्तरप्रदेश) येथील सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांकडून करवून घेतली जात होती ‘मेरे अल्ला’ प्रार्थना !

मदरसे किंवा चर्च येथे ‘हे श्रीकृष्णा’ अशा प्रकारची प्रार्थना कधीतरी करवून घेतली जाईल का ?

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील महंत मार्तंड पशुपती यांचा शिरच्छेद करण्याची धमकी

उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांना महंतांना अशा धमक्या मिळणे अपेक्षित नाही. याप्रकरणी सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे !

ताजमहालला २ कोटी रुपयांची पाणीपट्टी भरण्याची महापालिकेकडून नोटीस !

या नोटिसा २०२१-२२ आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरता आहेत. पुरातत्व विभागाला ही रक्कम भरण्याकरता १५ दिवसांची मुदतही देण्यात आली आहे.

कानपूर येथे हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर, तर प्रयागराज येथे धर्मांधांकडून हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार !

कानपूरमधील एका हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिला पळवून नेणार्‍या महंमद वकार याला कानपूर पोलिसांनी नुकतीच अटक केली.

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे दोन वेगवेगळ्या घटनांत ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न

उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार सत्तेत असूनही तेथे उद्दाम ख्रिस्ती हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करतात, हे संतापजनक ! हे रोखण्यासाठी कठोर कायद्यासह त्यांची प्रभावी कार्यवाही आवश्यक !

उत्तरप्रदेशातील फतेहपूर येथे धर्मांधाकडून विवाहित हिंदु महिलेवर बलात्कार

अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

गोंडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण करणार्‍या महंमद अमन याला अटक

अशांना आता शरीयत कायद्यानुसार शिक्षा करण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

बांगलादेशी घुसखोर रिझवान याच्या घरात सापडले लाखो रुपये

घुसखोरांकडे एवढे पैसे, दागिने आणि कागदपत्रे येईपर्यंत स्थानिक प्रशासन काय करत होते ?