हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या प्रयत्नांमुळे निपाणी (कर्नाटक) येथे शास्त्रानुसारच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

निपाणी येथे प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली भाविकांना मूर्तीदानाचे आवाहन केले होते. याला हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी तीव्र विरोध दर्शवत नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष यांना निवेदन दिले.

गोवा : हणजुणे येथील वादग्रस्त कर्लिस उपाहारगृहाचा बहुतांश भाग पाडला

कर्लिस उपाहारगृह पाडण्यासाठी आलेला खर्च उपाहारगृहाचा मालक आणि निष्क्रीय संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून वसूल करा !

पक्षनिधीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची आयकर चोरी उघड !

आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी या पक्षाच्या अध्यक्षाला या व्यवहाराविषयी विचारणा केली. त्या वेळी त्याने केवळ नावापुरते आणि ‘स्टेट्स’ साठी अध्यक्ष असून पक्षनिधी आणि इतर व्यवहार हे कर्णावती येथील लेखा परिक्षकाकडून (ऑडिटरकडून) केले जात असल्याचे त्याने सांगितले.

थेट सरपंचपदांसह १ सहस्र १६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान  !

विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ सहस्र १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ या दिवशी मतदान होणार आहे.

संभाजीनगर येथे ७ ठिकाणी आयकर विभागाची धाड !

७ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता आयकर विभागाच्या ४-५ पथकांनी शहरातील एकूण ७ ठिकाणी धाडी घातल्या. यामध्ये ४ उद्योजकांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. शहरातील मोठे उद्योजक सतीश व्यास यांच्या ज्योतीनगर येथील निवासस्थानी पहाटे ४ वाजता आयकर विभागाने धाड टाकली.

नाशिक येथील अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे हत्याकांड प्रकरणी ३ जणांना जन्मठेपेची शिक्षा !

२५ जानेवारी २०११ या दिवशी धाड टाकण्यासाठी गेलेले अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना इंधन माफियांनी जिवंत जाळून ठार मारले होते. यामध्ये एकूण ५ जणांना अटक करण्यात आली होती. यांतील एक आरोपी अल्पवयीन होता.

‘ई-पॉस मशिन’ सातत्याने बंद पडत असल्याने १० सहस्र मेट्रिक टन धान्य गोदामात पडून !

प्रशासन याविषयी काही उपाययोजना काढणार नाही का ? धान्य खराब झाल्यास त्यास कुणाला उत्तरदायी धरायचे ?

मविआ सरकार आणि मुंबई महापालिका यांचा ५०० कोटी रुपयांचा ‘महाकाली गुंफा’ घोटाळा ! – किरीट सोमैया, भाजप

अंधेरी येथील ‘महाकाली गुंफा’ परिसरातील विकासाच्या कामात शिवसेनेचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उजवा हात खासदार संजय राऊत कारागृहात आहेत

जालना येथील मंठा अर्बन को-ऑप. बँकेतील १२ कोटी १८ लाखांचा अपहार प्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद !

जिल्हा उपनिबंधकांनी लेखा परीक्षकांना संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याविषयी अनुमतीही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या शिफारसीने लेखापरीक्षकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये रिझर्व्ह बँकेकडून या बँकेवर निर्बंध लावण्यात आले होते.

वाकड येथील कृत्रिम हौदात विसर्जित २ सहस्रांहून अधिक श्रींच्या मूर्तींचे संकलन

धर्मद्रोहाची परिसीमा गाठत हौदात विसर्जन केलेल्या मूर्तींची पुनर्विक्री करण्याचा घाट ! केवळ हिंदु धर्माला विरोध आणि गणेशभक्तांचा अपमान म्हणून अशा कृती केल्या जातात, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?