कामचुकार कर्मचार्‍यांना सक्तीची निवृत्ती देण्याचा निर्णय सर्व सरकारी कर्मचार्‍यांना लागू ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

सरकारने सेवेत चांगली कामगिरी नसलेल्या, तसेच कामात निष्काळजीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांना सक्तीने सेवेतून निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिवालयातील खातेप्रमुखांना अशा स्वरूपाचा अधिकार देण्यात आला आहे.

गोवा : गेल्या ४ वर्षांपासून डिचोली, सांखळी आणि वाळपई परिसरात बांगलादेशी घुसखोरांचे वास्तव्य

बांगलादेशी घुसखोर भारत-बांगलादेश सीमेपासून म्हणजे भारताच्या पूर्वेकडून देशाच्या पश्चिमेला असलेल्या गोव्यात पोचेपर्यंत पोलिसांना किंवा सुरक्षायंत्रणांना याची माहिती न मिळणे, यावरून भारताची सुरक्षायंत्रणा किती कमकुवत आहे, ते लक्षात येते !

भाजपच्या बारामती मोहिमेसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांचा बारामती दौरा !

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन बारामती’ला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. २ वर्षांनंतर होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठीची सिद्धता भाजपने चालू केली आहे.

सध्याच्या लोकशाहीत हिंदूंना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय मिळत नसल्याने त्यांना हक्काचे हिंदु राष्ट्र मिळालेच पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली या देशात केवळ अल्पसंख्यांकांना विशेष सवलती देऊन देशात बहुसंख्य असतांनाही हिंदूंना ‘दुय्यम दर्जाचा नागरिक’ म्हणून वागणूक दिली जात आहे, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

गणेशोत्सव, दहीहंडी, आंदोलने यांसह कोरोना काळातील गुन्हे मागे घेण्यासाठी राज्यशासनाकडून समिती गठीत !

गणेशोत्सव, दहीहंडी, राजकीय तथा सामाजिक आंदोलने, तसेच कोरोनाच्या कालावधीत सरकारने घोषित केलेल्या नियमांचे झालेले उल्लंघन या प्रकरणी नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी राज्यशासनाकडून समिती गठीत करण्यात आली आहे. २० सप्टेंबर या दिवशी याविषयीचा शासन आदेश काढण्यात आला आहे.

मुंबईवर हक्क सांगण्याच्या भानगडीत पडू नका ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

मुंबईकरांनी २५ वर्षे विश्वास दाखवला. कसाबचे आक्रमण असा वा नैसर्गिक आपत्ती असो शिवसैनिकांनीच साहाय्य केले आहे; परंतु ज्यांना शिवसेनेने मोठे केले, ज्या सेनेने पदे दिली, त्यांनीच दगा केला, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.

खोटे आरोप करणार्‍यांवरील कारवाई घोषित करण्याची राज्य सरकारकडे मागणी

पत्राचाळ प्रकरणातील आरोपांवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

बदलापूर येथील शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर आक्रमण !

बदलापूर शहरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश मोरे यांच्यावर २० सप्टेंबरच्या रात्री ५ जणांनी बंदुकीचा धाक दाखवत आक्रमण केले. त्यात मोरे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील तरुणवर्गाचे आर्थिक खच्चीकरण चालू आहे ! – आदित्य ठाकरे, शिवसेना

वर्सोवा-वांद्रे सी लिंकच्या कामामध्ये सरकारने कंपनी आणि कॉन्ट्रॅक्टर पालटले आहेत. या कंपनीत नोकरीसाठी मुलाखतीचे आयोजन चेन्नई येथे ठेवण्यात आले.

आम्ही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये  ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राज्यात मोठे परिवर्तन झाले. जगातील ३३ देशांची याची नोंद घेतली. हा उठाव होता. हा संघर्ष सत्तेसाठी नव्हता.   नगरसेवकही सत्ता सोडत नाही. आम्ही सत्तेचा त्याग करून गेलो. आम्ही मिंधे नव्हे, तर बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देहली येथे केले.