पुणे महानगरपालिकेचा शतकोत्तर गणेशोत्सव आणि भ्रमणभाष अ‍ॅप शुभंकर यांच्या बोधचिन्हांद्वारे श्री गणरायाचे विडंबन !

पुण्याचे वैशिष्ट्य असणार्‍या गणेशोत्सवाची शान आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या बोधचिन्हातून श्री गणेशाचे विकृत रूप दाखवण्याऐवजी मूर्तीशास्त्रानुसार योग्य रूपातील गणेशमूर्ती घेतली असती, त्याची खर्‍या अर्थाने प्रसिद्धी झाली असती !

स्टॅम्प पेपर घोटाळाप्रकरणी मोपलवारांना विलासराव देशमुखांनी वाचवले ! – भाजप आमदार अनिल गोटे यांचा आरोप

समृद्धी महामार्गाचे संचालक राधेश्याम मोपलवार स्टॅम्प पेपर अधीक्षक असतांना त्यांनी तेलगीने बनवलेले बोगस स्टॅम्प पेपर विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबईच्या गुन्हे शाखेने मोपलवारांवर गुन्हा प्रविष्ट केला होता

१५ ऑगस्टला ध्वजारोहण करण्यासाठी येणार्‍या मंत्र्यांचे हात बांधून ठेवू – आमदार बच्चू कडू

शासनाच्या कर्जमाफीवरील निर्णयाने आमचे समाधान झालेले नाही. विधानसभेत विषय मांडूनही त्यावर आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.

मुंबई महापालिका मुख्यालयातील अनेक सीसीटीव्ही निकामी

आझाद मैदानातील मोर्च्यावर लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेर लावलेल्या ३२ सीसीटीव्हींपैकी ७ कॅमेरे पूर्णत: बंद आहेत.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे गणेशमूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेट वापरण्याचे आवाहन

‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बरेच दिवस पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्‍न निर्माण होतात.

पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये २ सहस्र १६० विद्यार्थ्यांकडून शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवण्याचा विक्रम

येथील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग या शाळेतील २ सहस्र १६० विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचा एक आगळावेगळा विक्रम १२ ऑगस्टला केला.

इचलकरंजी पोलीस दलाने अवैध व्यवसायांवर त्वरित नियंत्रण आणावे – पोलीस अधीक्षक संजय मोहिते

शहरातील मटका, मद्य आदी अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावल्याने लोक त्याविषयी जाहीरपणाने बोलतात. त्यामुळे इचलकरंजी पोलीस दलाने या अवैध व्यवसायावर त्वरित नियंत्रण आणावे, असा आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी येथे दिला.

पुढील वर्षांपासून शाडू मूर्तींची प्रतिष्ठापना – पुणे येथील गणेशोत्सव मंडळे

सकाळ कार्यालयात झालेल्या बैठकीत पुण्यातील १५० हून अधिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुढील वर्षांपासून शाडूमातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला.

आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील सुमेध गवई हुतात्मा !

काश्मीरमधील शोपियान येथे आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील सुमेध गवई या २५ वर्षीय सैनिकाला वीरमरण आले आहे. गवई हे अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचे रहिवासी होते.

मुंबई विद्यापिठातील गोंधळ दूर करण्यासाठी प्रशासक नेमा ! – आदित्य ठाकरे

मुंबई विद्यापिठातील गोंधळ दूर करण्याकरता प्रशासकपदी भारतीय प्रशासकीय अधिकारी (आयएएस्) किंवा भारतीय पोलीस सेवेतील अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ११ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानभवनात भेटून केली.


Multi Language |Offline reading | PDF