कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची अफवा पसरवणार्‍यास पोलिसांनी घेतले कह्यात

कोरोना विषाणूच्या संदर्भात ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ध्वनीमुद्रित क्लिप सिद्ध करून अफवा पसरवणार्‍या एका संशयित व्यक्तीस येथील पोलिसांनी २६ मार्च या दिवशी कह्यात घेतले आहे…

लॅटव्हियामध्ये (युरोप) अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी साहाय्य करणार ! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद करण्यात आली आहे. याचा परिणाम युरोप खंडातील लॅटव्हियाची राजधानी रीगा विमानतळावर भारतातील ३७ विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांचा भारतात परतण्यासाठी केंद्रशासनाशी संपर्क चालू आहे.

चंद्रपूर येथील मशिदीतून १४ मौलवी कह्यात

स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी धाड टाकून येथील एका मशिदीतून ११ तुर्कस्तानी, तर भारतातील अन्य भागांतील ३ अशा एकूण १४ मौलवींना कह्यात घेतले आहे…….

इराणी व्यक्ती नगर येथून पसार झाल्याप्रकरणी सिंग रेसिडेन्सी उपाहारगृहच्या मालकासह तिघांवर गुन्हा नोंद

शहरातील तारकपूर परिसरात असलेल्या सिंग रेसिडेन्सी उपाहारगृह येथे २४ मार्च या दिवशी ईराज रेझई (वय ४८ वर्षे) या नावाची इराणी व्यक्ती स्वत:ची ओळख लपवून ६ घंटे राहून निघून गेली…….

दळणवळण बंदी असतांनाही मुंबईतील प्रवाशांना समुद्रमार्गे गुहागरमध्ये आणणार्‍या बोट मालकांवर गुन्हा नोंद

देशात दळणवळण बंदी असतांना आणि त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा बंद असतांना मुंबईतील प्रवाशांना समुद्रमार्गे गुहागरमध्ये आणणार्‍या बोट मालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी ही माहिती दिली आहे.

किमान कर्मचार्‍यांना उपस्थित ठेवून पतसंस्थाचे कामकाज चालू ठेवण्याचे निर्देश ! – अधिवक्ता दीपक पटवर्धन

सहकारी पतसंस्थांमध्ये जनतेचा पैसा गुंतलेला असतो, सबब ग्राहकांची पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी पतसंस्था चालू रहाणे आवश्यक ठरते, किमान कर्मचार्‍यांना उपस्थित ठेवून कामकाज करावे, असे निर्देश आज सहकार आयुक्त यांनी परिपत्रक काढून दिले आहेत.

१४ एप्रिलपर्यंत मुंबईतील लोकल आणि लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस बंद रहाणार ! – रेल्वे प्रशासन

मुंबई शहर आणि उपनगर यांमधील मध्य, पश्‍चिम आणि हार्बर मार्गावर एकही रेल्वे धावणार नसून या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस १४ एप्रिलपर्यंत बंद रहाणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाने घोषित केले आहे.

सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखण्यासाठी तळेगाव पोलिसांकडून भाजीमंडईमध्ये एक मीटर अंतरावर चौकोनी पट्टे

जनहो, स्वयंशिस्त पाळा ! पोलीस-प्रशासनाचा वेळ छोट्या छोट्या गोष्टींसाठी वाया घालवू नका !

सोलापूर येथे ऑनलाईन लॉटरी व्यवसायावर गुन्हे शाखेची धाड

येथे ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार व्यवसाय करणार्‍या ‘खेलो जीतो’, ‘फेअरडिल’ आणि ‘साई लकी कुपन’ या ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर सोलापूर गुन्हे शाखेने धाड टाकली.

जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रांजणगाव (ता. शिरुर, जिल्हा पुणे) येथे ५ जणांवर गुन्हा नोंद

नागरिकांनो, जमावबंदीच्या आदेशाचे शतप्रतिशत पालन करा ! शासकीय सूचनांचे पालन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे.